मुंबई - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी नार्कोटिक्स विभाग करत असलेल्या कारवाईमध्ये ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर करण जोहरचे नाव उजेडात आले. बॉलिवूडच्या ड्रग्ज पार्ट्यांमधील एक पार्टी करणच्या घरात झाल्याचे वृत्त आल्यानंतर त्याने हे सर्व फेटाळून लावत संबंधित आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले. माध्यमांनी केलेल्या आरोपाचे खंडन करत दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याने निवेदन जारी केले आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या निवेदनात त्याने कोणतेही अमली पदार्थांचे सेवन करत नसल्याचे सांगितले. तसेच मी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे किंवा तत्सम गोष्टींचे समर्थन करत नसल्याचा दावा त्याने केला आहे.
- — Karan Johar (@karanjohar) September 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Karan Johar (@karanjohar) September 25, 2020
">— Karan Johar (@karanjohar) September 25, 2020
करण जोहरचा पार्टीमधील जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. सध्या सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात नार्कोटिक्स विभाग कारवाई करत आहे. यामध्ये ड्रग्ज पेडलरचे कनेक्शन समोर आले. तसेच दिपीका पादुकोणसह, सिमरन खंबाटा आणि अन्य अभिनेत्रींची नावं देखील समोर आली आहेत. आता करण जोहर पार्टी करत असतानाचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचेही नाव ड्रग्जच्या प्रकरणात समोर आले आहे. संबंधित पार्टी करणच्या घरात होत असल्याचा दावा काही माध्यमांनी केलाय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी करणने मोठं निवेदन जारी केलंय.