ETV Bharat / city

कांजूरमार्ग होणार 'मेट्रो हब'! मेट्रो 3, 6 बरोबर 4 चे कारशेड एकाच ठिकाणी? प्रस्ताव एमएमआरडीएच्या विचाराधीन - कांजूरमार्ग मेट्रो हब

मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीपझ) च्या कारशेडच्यानिमित्ताने कांजूरमार्गमधील मेट्रो 6 (स्वामी समर्थ नगर) च्या कारशेडची कांजूरमार्ग येथील जागा सद्या चर्चेत आली आहे. या ठिकाणी आता दोन मेट्रो मार्गाचे कारशेड होणार आहे. पण येत्या काळात ही जागा 'मेट्रो हब' म्हणून ओळखली गेली तर आश्चर्य वाटायला नको.

metro
मेट्रो संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 22, 2020, 8:53 PM IST

मुंबई - मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीपझ) च्या कारशेडच्यानिमित्ताने कांजूरमार्गमधील मेट्रो 6 (स्वामी समर्थ नगर) च्या कारशेडची कांजूरमार्ग येथील जागा सद्या चर्चेत आली आहे. या ठिकाणी आता दोन मेट्रो मार्गाचे कारशेड होणार आहे. पण येत्या काळात ही जागा 'मेट्रो हब' म्हणून ओळखली गेली तर आश्चर्य वाटायला नको. कारण भविष्यात येथे दोन नव्हे तर तीनमेट्रो मार्गाचे कारशेड होण्याची शक्यता आहे. मेट्रो 4 (वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली) चे कारशेड येथे होईल. तर मेट्रो 14 (बदलापूर-कांजूरमार्ग) मार्गाचे टर्मिनल स्थानकही येथे असेल. कारण मेट्रो 3, 6 बरोबर 4 चे कारशेड एकत्र कांजूर येथे उभारले जाऊ शकते का? यादृष्टीने विचार करण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा ( एमएमआरडीए) ने सकारात्मकता दर्शविली आहे.

हेही वाचा - 'बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राचे काय?'

मेट्रो 3 चे कारशेड आरेतून कांजूरला हलवण्यात आले आहे. कांजूर येथे पूर्व द्रुतगती मार्गालगत 102 एकर जागा आहे. या जागेवर मेट्रो 6 चे कारशेड बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. त्यानुसार ही जागा हस्तांतरित ही करून घेतली. महत्वाचे म्हणजे मेट्रो 3 चे कारशेड ही याच जागेवर व्हावे, आरेतून कारशेड हलवावे अशी मागणी होती. पण या मागणीकडे कानाडोळा करत हे कारशेड आरेतच बांधण्यात येत होते. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी आरेतून कारशेड हलवत ते कांजूरला नेत असल्याचे जाहीर केले. इतकेच नव्हे तर घोषणा झाली त्याच दिवशी कांजूरच्या जागेवर कामाला सुरुवात ही झाली.

मेट्रो 3 आणि 6 चे कारशेड एकत्रित करण्याबरोबरच या दोन्ही मार्गाचे एकत्रिकरण ही करण्यात आले. म्हणजेच मेट्रो 3 चा मार्ग मेट्रो 6 वरील साकीविहार मेट्रो स्थानकाशी जोडून मेट्रो 3 पुढे कांजूरला नेली जाणार आहे. यामुळे आता खर्च आणि जागा वाचणार आहे. कांजूरमध्ये मेट्रो 3 आणि मेट्रो 6 चे कारशेड आल्यानंतर मेट्रो 4 चे कारशेड ही येथेच करा अशी मागणी पर्यावरण प्रेमी रोहित जोशी यांनी केली होती. तर यामुळे कोट्यवधी रुपये वाचतील, विस्थापन करावं लागणार नाही की आणखी जागा घ्यावी लागणार नाही असे म्हणत त्यांनी ही मागणी केली होती. त्यांनी इकडे मागणी केली असता दुसरीकडे एमएमआरडीएने यावर विचार सुरू केलाच होता. कांजूरमध्ये जागा असून एकाच ठिकाणी अनेक कारशेड असतील तर बांधकाम आणि पुढे व्यवस्थापन सोपे होऊ शकते. तर खर्च ही वाचू शकतो. त्यामुळेच एमएमआरडीएने यादृष्टीने विचार सुरू केला आहे.

हेही वाचा - मुंबई-रायगडच्या किनारपट्टीलगतच्या भागाला वाढला पुराचा धोका; 17 वर्षात 110 टक्क्यांनी बांधकामात वाढ

एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त बी जी पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण असा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एमएमआरडीएने जर मेट्रो 4 चे कारशेड कांजूरला करण्याचा निर्णय घेतला तर कांजूर नक्कीच भविष्यात 'मेट्रो हब' म्हणून ओळखले जाऊ शकते. कारण तीन मेट्रो मार्गाचे कारशेड एकाच ठिकाणी, तर एका मेट्रो मार्गाचे टर्मिनल स्थानकही याच ठिकाणी. त्यामुळे या जागेला येत्या काळात महत्व येणार आहे. त्याचवेळी आरेमध्ये 33 मजली मेट्रो भवन एमएमआरडीएकडून उभारण्यात येणार आहे. मात्र आरेत मेट्रो भवन उभारण्यास सेव्ह आरेचा विरोध आहे. तर हे मेट्रो भवन ही कांजूरला हलवण्याची मागणी होत आहे. तेव्हा ही मागणी मान्य झाली तर कांजूर मेट्रोच्या दृष्टीने आणखी महत्वाचे ठिकाण ठरेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.