मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर, यासंदर्भात पोलिस ठाण्याकडून कंगना रणौत व तिची बहीण रंगोली चंदेल यांना चौकशीसाठी सलग तीन वेळा समन्स बजावण्यात आलेले होते. मात्र, तीन वेळा समन्स देऊनही कंगना रणौत व तिची बहीण रंगोली चंदेल हे चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. दरम्यान वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये कंगनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.
वादग्रस्त ट्विटप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांना वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहेत. कंगना आणि तिची बहीण रंगोली या दोघींना तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, कंगनाने वैयक्तिक कारणामुळे चौकशीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत हजर राहू शकणार नाही, असे कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी तिसरी नोटीस बजावत तिला 23 नोव्हेंबर 24 नोव्हेंबर अशा दोन दिवशी हजर राहण्याची नोटीस दिली होती.
उच्च न्यायालयात काय होणार..
अभिनेत्री कंगना रणौतकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्या नंतर आता उच्च न्यायालयाकडून अभिनेत्री कंगना राणावत हिची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. त्याबरोबरच या प्रकरणातील तक्रारदार यांनाही समन्स बजावल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाला जर या प्रकरणी कंगना राणौत दोषी आढळली, तर कंगना राणौतची चौकशी करण्यासाठी तिला वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याचे आदेश स्वतः मुंबई उच्च न्यायालय देऊ शकते.
काय आहे प्रकरण..?
काही दिवसांपूर्वी कंगना रणौतच्या ट्विटर अकाऊंटवरून एक वादग्रस्त ट्विट करण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले होते की, बॉलिवूडमध्ये हिंदू- मुस्लीम तणाव असून, मुस्लीम कलाकार आणि हिंदू कलाकार यांच्यामध्ये मतभेद आहेत. या ट्विटमुळे सामाजिक द्वेष वाढल्याचा आरोप करत, मूनवर आली खान यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
खान यांनी दाखल केलेल्या या याचिकेच्या आधारे न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच, वांद्रे न्यायालयाने पोलिसांना कंगनाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून, त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते.
अंधेरीतही दाखल झाली होती याचिका -
दरम्यान, वांद्र्याप्रमाणेच मुंबईतील अंधेरी मॅजिस्ट्रेट न्यायालयातही कंगना रणौतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका आली कशीफ खान देशमुख यांच्याकडून दाखल केली होती. कंगना रणौतने तिच्या ट्विटर अकाउंटवर दोन समाजांमध्ये वैमनस्य निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य वारंवार केले असून, त्यासंबंधी कलमांनुसार तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
हेही वाचा - भावाच्या लग्नात कांगडी गाण्यावर मनसोक्त थिरकली कंगना राणौत
हेही वाचा - ...तर कंगना रनौत कायदेशीर कारवाईला पात्र ठरेल - उज्ज्वल निकम