मुंबई - ठाणे आणि दिवा या पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामानिमित्त मध्य रेल्वेने तब्बल 18 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला. रविवारी सकाळी 8 ते सोमवारी रात्री 2 वाजेपर्यंत ब्लॉक होता. या ब्लॉक कालावधीत 160 पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून 20 पेक्षा जास्त मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. रात्री ब्लॉक कालावधीत संपल्यानंतर लोकल पुन्हा कळवा, मुंब्रा धिम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे.
नव्या मार्गावर धावणार लोकल -
मुंबईकरांचा लोकलचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-2 (एमयुटीपी) मध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचा समावेश आहे. मात्र, त्यात अडथळे येत गेल्याने अजूनही हा प्रकल्प रखडत होता. आता ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिकेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकल्पांना २००८ साली मंजुरी मिळाली. तरीही निधी, जागेचे नियोजन, नागरिकांचे पुनर्वसन अशा अनेक कारणांमुळे वर्षानुवर्षे प्रकल्प रखडला. मात्र अखेर या कामाला आता रेल्वेकडून गती मिळाली आहे. मेगाब्लॉक घेऊन रेल्वे युद्धपातळीवर काम करत आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या पायाभूत कामासाठी रविवारी सकाळी 8 वाजेपासून ते सोमवारी रात्री 2 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लाॅक घेतला आहे. या ब्लॉकनंतर कळवा ते मुंब्रा डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा नवीन ट्रॅकवर इलेक्ट्रिक पोल 36/21 ते 38/7 आणि नवीन बोगदा क्रमांक 1 मार्गे सुमारे 1.6 किमी लांबीच्या रेल्वेमार्गावरून चालवण्यात येतील.
नवीन बोगदा सुद्धा धावणार लोकल -
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर लोकल सध्याच्या डाऊन धिम्या मार्गावर चालवण्यात येतील. तर, अप धीम्या लोकल मुंब्रा ते कळवा या नवीन बोगदा क्रमांक 1 मार्गे इलेक्ट्रिक पोल 38/7 ते 36/21 पर्यंत नवीन ट्रॅकवर चालवण्यात येतील. बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर, लोकल सध्याच्या अप धीम्या मार्गावर धावतील.