मुंबई - मुंबईत पर्यटनाला सुरुवात करताना गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, जहांगीर कला दालन आणि येते मग काळा घोडा परिसराचे नाव. लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. काळा घोडा ( Mumbai Kala Ghoda ) या नावावरुन फेस्टिव्हलचे देखील आयोजन करण्यात येते. तर, आपण काळा घोडा पुतळा आणि परिसराबाबत जाणून घेणार आहोत.
ब्रिटीशांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अल्बर्ट ससून यांनी 1879 साली हा पुतळा बांधला होता. 26 जून 1879 साली माजी गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल यांनी त्याचे उद्घाटन केले. तेव्हा जहांगीर आर्ट गॅलरीच्या समोर पुतळा बांधण्यात आला. पुढे 1965 साली जिजातमाता उद्यानाच्या दर्शनी भागात हा पुतळा हलवण्यात आला. आज येथे सातव्या राजाचा पुतळा नसला तरीही घोड्याचा एक पुतळा उभारण्यात आला आहे. तसंच काळा घोडा ही या परिसराची ओळख कायम राहिली आहे. जिजातमाता उद्यानात असलेल्या पुतळ्यावर सातवा राजकुमार संपूर्ण लष्करी लष्करी, फिल्ड मार्शलच्या, गणवेशात घोड्यावर सवार आहे. राज्याच्या बुटापासून केसापर्यंत काळ्या दगडात हा पुतळा कोरल्याने जीवंतपणा त्यात आला आहे. घोडा कधीही चालायला लागले, असा भास क्षणभर होतो.
या परिसराला काळा घोडा नाव का पडले याबाबत मात्र, मते आहेत. सातवा एडवर्ड की घोडा. त्यात लोकांच्या लक्षात घोडा राहिला. तसेच, जे ब्रिटिश आपल्यावर राज्य करतात. त्यांच्या राजाचे नाव कसे घ्यायचे, या मुद्यावरुन काळा घोडा असा उल्लेख केला गेला.
काय आहे काळा घोडा फेस्टिव्हल?
मुंबईत आयोजित होणारा काळाघोडा फेस्टिव्हल हा एक सांस्कृतिक महोत्सव आहे ज्यामध्ये कलेशी जोडले गेलेले लोक, कलेचे जपणूक करणारे लोक आणि कलेत रस असणारे सामान्य नागरिक सामील होतात. देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक फेस्टिव्हल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महोत्सवात देशातून अनेक कलाकार येऊन आपली कला सादर करतात, तर नवोदित कलाकारांना कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन आणि खुले व्यासपीठ देण्यात येते. या फेस्टिव्हलमध्ये कला, क्राफ्ट, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य, संगीत, विविध राज्यातील स्टॉल, मुलांसाठी वेगळे सेक्शन, इनोव्हेटिव इंस्टॉलेशन सर्व पाहायला मिळते.
याबाबत काळा घोडा फेस्टीवलच्या हॉनर चेयरपर्सन ब्रिंदा मिलर म्हणाल्या की, कोरोनामुळे फेस्टिव्हल घेता आले नाही. डिजीटल फेस्टिव्हल घेतले, पण तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. काळाघोडा परिसराची माहिती दर्शनी भागात लावण्यासाठी पत्रव्यवहार सुरु आहे. तसेच, हा भाग पर्यटन स्थळ बनवण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - Video : महापौर किशोरी पेडणेकरांनी लुटला रस्सीखेच खेळाचा आनंद