ETV Bharat / city

Jyeshtha Gauri Visarjan 2022 सोनपावलांनी आलेल्या गौरींना सोमवारला निरोप देण्यात आला - jyeshtha Gauri Pujan

तिसऱ्या दिवशी म्हणजे, मूळ नक्षत्रावर गौरींना-महालक्ष्मींना Gauri Mahalakshmi निरोप दिल्या जातो. गौरी - महालक्ष्मी म्हणजे साक्षात माता पार्वतीचे रुप मानले जाते. ही माता पार्वती तीन दिवसाकरीता, माहेरवाशीनी म्हणुन आपल्या माहेर पणाला येत असते. आज सोमवारला सोनपावलांनी आलेल्या गौरींना निरोप Jyeshtha Gauri Visarjan on Monday देण्यात आला. Jyeshtha Gauri Visarjan 2022

Jyeshtha Gauri Visarjan 2022
गौरींना सोमवारला निरोप
author img

By

Published : Sep 5, 2022, 1:58 PM IST

मुंबई सहा दिवसांपासून गणपती व त्यानंतर गौरींच्या पूजनात jyeshtha Gauri Pujan सुवासिनी रमून गेल्याने, विसर्जनाच्या दिवशी त्यांना काहीशी हुरहूर लागल्याचे दिसून आले. अनेक घरांमध्ये गौरी गणपतीचा सण हा वर्षातील सर्वांत मोठा सण असतो. यंदाही वर्षातून तीन दिवस माहेरी येणाऱ्या गौरींसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. फराळाचे विविध प्रकार, पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविण्यात आला होता. रांगोळ्या, फुलांच्या गालिचांची सजावट करण्यात आली होती. सुवासिनींनी पारंपरिक वेशभूषा करून गौरीपूजन केले. अनेक घरांमध्ये गिरिधारी पर्वत, हळदी-कुंकवातील महालक्ष्मी, गरुडावर आरुढ झालेली लक्ष्मी अशा आकर्षक सजावटी करण्यात आल्या होत्या. तीन दिवसांसाठी माहेरी आलेल्या गौरींना सोमवारला निरोप Jyeshtha Gauri Visarjan on Monday देण्यात आला. Jyeshtha Gauri Visarjan 2022

निरोप देण्याच्या विधी तिसऱ्या दिवशी म्हणजे, मूळ नक्षत्रावर गौरींना-महालक्ष्मींना Gauri Mahalakshmi निरोप देतात. या दिवशी सकाळी पोवत्याच्या-सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची- महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या-महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो. धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत. महालक्ष्मीचे मुखवटे हलवून निरोप दिल्या जातो. अनेक घरांमध्ये शेवटच्या दिवशीही हळदी-कुंकवासाठी सुवासिनींची बोलावले जाते. दर्शनासाठी आरास दिवसभर तशीच ठेवण्यात येत असते. तसेच, लाकडाच्या परड्यावरती पेरलेल्या गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर, परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. असे केल्यास, घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.

गौरी - महालक्ष्मी म्हणजे साक्षात माता पार्वतीचे रुप मानले जाते. ही माता पार्वती तीन दिवसाकरीता, माहेरवाशीनी म्हणुन आपल्या माहेर पणाला येत असते. हे तीन दिवस घरी आलेल्या लेकीचे सगळे लाड पुरवण्यात व तिला गोड-धोड खाऊ घालण्यात कसे निधुन जातात, हे घरच्यांना देखील कळत नाही. त्यामुळे तिला निरोप देतांना घरातील सगळेच खरोखरच भावुक होत आसतात. Jyeshtha Gauri Visarjan 2022

हेही वाचा Shardiya Navratri 2022: कधीपासून सुरू होतेय शारदीय नवरात्री?, जाणून घ्या घटस्थापनेची वेळ अन् मुहूर्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.