मुंबई- उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 4 एप्रिल 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी मेगा ब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.00 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉग दरम्यान मुलुंड ते कल्याण दरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहे. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ठाणे, दिवा, डोंबिवली या स्थानकादरम्यान थांबतील आणि वेळापत्रक आपेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचतील. मात्र, ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली या रेल्वे स्थानकावर लोकल थांबणार नाही.
हेही वाचा-औरंगाबाद शहरातील रक्तासाठा संपला! रक्तदान करण्याचे प्रशासनाचे आवाहन
हार्बर मार्गावर मेगाब्लॉकची अशी असेल वेळ-
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप व डाऊन मार्गावर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर नेरुळ व बेलापूर -खारकोपर सकाळी 10.03 वाजता ते सायंकाळी 4.01 वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी 10.03 ते दुपारी 3.16 दरम्यान पनवेल बेलापूर करिता सुटणारी व हार्बर मार्गावरील पनवेल बेलापूर येथून सकाळी 10.49 ते सायंकाळी 4.01 वाजेपर्यंत सीएसएमटी करीता सुटणारी सेवा रद्द राहणार आहे. तर पनवेल ते ठाणे आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.
हेही वाचा-औरंगाबादेत कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढले, मार्च महिन्यात 435 जणांचा मृत्यू
पश्चिम रेल्वेवर रात्री मेगाब्लॉक-
पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी वसई रोड ते विरार रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. हा ब्लॉक रविवारी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक कालावधीत वसई रोड ते विरार दरम्यान आणि डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसा मेगाब्लॉक नाही.