ETV Bharat / city

Jitendra Awhad slammed center gov : दत्त गुरू भगवान आणि गाय दोघावरच केंद्राने जीएसटी लावला नाही...जितेंद्र आव्हाडांची केंद्रावर टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Nirmala Sitharaman GST ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST कौन्सिलने गेल्या आठवड्यात आपल्या बैठकीत कॅन किंवा पॅकेज केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, सुका सोयाबीन, मटार, यांसारख्या उत्पादनांना मान्यता दिली आहे. गहू आणि इतर अन्नधान्य आणि तांदूळ यावर ५% जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावरून देशभरात टीका करण्यात येत आहे.

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Jul 19, 2022, 1:37 PM IST

मुंबई - एसटी कौन्सिलच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर 18 जुलैपासून अनेक खाद्यपदार्थ महाग झाले ( packed and label products costlier ) आहेत. यामध्ये पीठ, पनीर आणि दही यांसारख्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश ( new gst rate on packed foods ) आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत जीएसटीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की एक जुनी ओवी आठवली... ग्रामीण भागात म्हणत दत्त दत्त दत्ताची गाय गायीचं दूध , दुधाची साय सायीचं दही , दह्याचं ताक ताकाचं लोणी , लोण्याचं तूप या ओवींच्या ओळींमधले फक्त दत्त गुरू भगवान आणि गाय दोघंचं राहिले ज्यांच्यावर केंद्राने #GST कर नाही लावला

  • एक जुनी ओवी आठवली...
    ग्रामीण भागात म्हणत
    दत्त दत्त दत्ताची गाय
    गायीचं दूध , दुधाची साय
    सायीचं दही , दह्याचं ताक
    ताकाचं लोणी , लोण्याचं तूप
    या ओवींच्या ओळींमधले फक्त दत्त गुरू भगवान आणि गाय दोघंचं राहिले
    ज्यांच्यावर केंद्राने #GST कर नाही लावला

    — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्यांनी आणखी ट्विट करत आईची आठवण आल्याने ट्विट केल्याचे म्हणत सरकारच्या जीएसटी दराची खिल्ली उडविली आहे.

ज्यावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होईल. अशाप्रकारे, 5,000 रुपयांपेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या हॉस्पिटलच्या खोल्यांवरही जीएसटी भरावा ( rent of hospital rooms gst ) लागेल. याशिवाय दररोज 1,000 रुपयांपेक्षा कमी भाड्याने देणाऱ्या हॉटेलच्या खोल्यांवर 12 टक्के दराने कर आकारण्याचे सांगण्यात आले आहे. त्यावर सध्या कोणताही कर नाही.

१८ जुलैपासून बदल लागू : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST कौन्सिलने गेल्या आठवड्यात आपल्या बैठकीत कॅन किंवा पॅकेज केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, सुका सोयाबीन, मटार, यांसारख्या उत्पादनांना मान्यता दिली आहे. गहू आणि इतर अन्नधान्य आणि तांदूळ यावर ५% जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. कर दरातील बदल 18 जुलैपासून लागू होणार आहेत. त्याचप्रमाणे, टेट्रा पॅक आणि बँकेद्वारे जारी केलेल्या धनादेशांवर 18 टक्के जीएसटी आणि ऍटलससह नकाशे आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी आकारला जाईल.

अनब्रँडेड उत्पादनांवर जीएसटी सूट कायम : उघड्यावर विकल्या जाणार्‍या अनब्रँडेड उत्पादनांवर जीएसटी सूट कायम राहील. 'प्रिंटिंग/ड्रॉइंग इंक', धारदार चाकू, पेपर कटिंग चाकू आणि 'पेन्सिल शार्पनर', एलईडी दिवे, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादनांवरील कराचे दर 18 टक्के करण्यात आले आहेत. सोलर वॉटर हीटर्सवर आता 12 टक्के जीएसटी लागणार आहे, जो पूर्वी पाच टक्के कर होता. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि स्मशानभूमीच्या कामाच्या कंत्राटांवर आता १८ टक्के जीएसटी लागू होईल, जो आत्तापर्यंत १२ टक्के होता. ( GST On Unbranded Products )

काही उत्पादनांवर जीएसटी घटवला : मात्र, रोपवे आणि काही सर्जिकल उपकरणांद्वारे माल आणि प्रवाशांच्या वाहतुकीवरील कराचा दर पाच टक्क्यांवर आणण्यात आला आहे. पूर्वी तो 12 टक्के होता. ट्रक, मालाच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर, ज्यामध्ये इंधनाचा खर्च समाविष्ट आहे, आता 18 टक्क्यांऐवजी 12 टक्के जीएसटी लागू होईल. बागडोगरा ते ईशान्येकडील राज्यांच्या हवाई प्रवासावरील जीएसटी सूट आता इकॉनॉमी क्लासपुरती मर्यादित असेल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.