मुंबई - राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशानाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर टिकेचे सूर उमटले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर याबाबत संताप व्यक्त केला. कुणाच्या ही आजारपणावर टीका करणे, आपली संस्कृती नाही. आपला बाप आजारी असताना, आपण अशी चर्चा करतो का, असा संतप्त सवाल त्यांनी विरोधकांना यावेळी विचारला. विधानभवना बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
हे ही वाचा - Assembly Winter Session : प्रथा बदलण्याचा अट्टाहास का.. 170 च्या बहुमतावर सरकारला विश्वास नाही का? फडणवीस यांचा सवाल
..देर आये दुरुस्त आये
शरद पवार यांनी लागू केलेले आरक्षण आता रद्द होण्याची वेळ आली आहे. केंद्राने सांगितले इम्पेरिकल डेटा बरोबर आहे. तोच डेटा नंतर सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर बरोबर नसल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार संभ्रम निर्माण करणारा आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला एक न्याय आणि मध्य प्रदेशला एक न्याय, अशी वागणूक देत आहे. परंतु, असो.. देर आये दुरुस्त आये, अशी शेरोशायरी करत आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला.