मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात मुले पळणारी टोळी सक्रिय झाली असल्याचे ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. आव्हाड यांनी आज पुन्हा एकदा होळीच्या निमित्ताने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मार्केटमध्ये 'मोदी' नावाचा नवीन रंग आला असून एकदा लावला की तासाला बदलतो' असे ट्विट आव्हाड यांनी #holi च्या निमित्ताने केले आहे.
आव्हाड यांच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली असून रंगाच्या अनेक प्रकारात मोदींचा कसा रंग जुळतो, अशा टीका केल्या आहेत. तर अनेकांनी आव्हाड यांना टार्गेट करत त्यांच्यावर टीकेच्या रंगाची उधळण केली आहे.
जितेंद्र आव्हाड हे आपल्या ट्विट आणि विविध विधानांनी कायम चर्चेत असतात. त्यांनी यावेळी येत असलेल्या होळीचा आधार घेत मोदींवर निशाणा साधला आहे. बाजारात नवीन आलेला मोदी रंग हा तासाभराने बदलतो असे सांगत एकाच वेळी मोदी आणि भाजपलाही लक्ष केले आहे.