ETV Bharat / city

Andheri By Election: पोटनिवडणुकीतून माघार घेणे हे भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण - जयंत पाटील - ऋतुजा लटके

अंधेरी पोटनिवडणुकीतून (Andheri by elelction) भाजपने अखेर माघार घेतली आहे. मात्र हा निर्णय म्हणजे खरंतर भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.

Jayant Patil
Jayant Patil
author img

By

Published : Oct 17, 2022, 6:17 PM IST

मुंबई: अंधेरी पोटनिवडणुकीतून (Andheri by elelction) भाजपने अखेर माघार घेतली आहे. मात्र हा निर्णय म्हणजे खरंतर भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.

काय म्हणाले जयंत पाटील ? : या निवडणुकीसाठी सुरू असलेले डावपेच ज्यामध्ये ऋतुजा लटके (Rutuja latke) यांचा राजीनामा मंजूर न करणे, त्यांना नाईलाजाने कोर्टात जावे लागणे, हा सर्व प्रकार अत्यंत क्लेषदायक व वेदनादायक होता. सोबतच पक्षाचे चिन्ह गोठवणे, नाव गोठवणे हा प्रकारही या निवडणुकीसाठीच करण्यात आला, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राची परंपरा ही यापेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्रात एखाद्या जागेसाठी काही दिवस शिल्लक असताना शक्यत: निवडणूक बिनविरोध होते. तसेच या निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला असता, असा दावाही त्यांनी केला. या निर्णयातून अनावश्यक गोष्टी टळल्या आहेत असे ते शेवटी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.