ETV Bharat / city

Jayant Patil on ED : आघाडीच्या नेत्यांबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न - जयंत पाटील - Jayant Patil

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या ( ED action against Sanjay Raut ) कारवाईबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मला वाटते की एखादी कारवाई करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला नोटीस देणे आधी कल्पना ( No ED notice to Sanjay Raut ) देणे आवश्यक असते. संजय राऊत यांना याची कोणतीच कल्पना ( Jayant Patil on Sanjay Rauts property ) नव्हती, असे दिसत आहे.

जयंत पाटील
author img

By

Published : Apr 5, 2022, 7:15 PM IST

Updated : Apr 5, 2022, 7:42 PM IST

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील कारवाई म्हणजे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करणे ( ED action to defame MH gov ) आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांबाबत संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणे असा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या ( ED action against Sanjay Raut ) कारवाईबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मला वाटते की एखादी कारवाई करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला नोटीस देणे आधी कल्पना ( No ED notice to Sanjay Raut ) देणे आवश्यक असते. संजय राऊत यांना याची कोणतीच कल्पना ( Jayant Patil on Sanjay Rauts property ) नव्हती, असे दिसत आहे. त्यामुळे पूर्ण कल्पना देऊन प्रॉपर्टीबद्दल काही आक्षेप असेल तर नोटीस देणे आवश्यक होते. मात्र, त्यांच्यावर दबाव आणण्याचा हा एक प्रयत्न यातून दिसतो. त्यांनी काय पुरावे दिले, याची मला माहिती नाही. त्याबद्दल मला आता बोलता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयानेदेखील कारवायाबद्दल आपली मते दोन दिवसापूर्वी व्यक्त केली आहेत. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जर दुरुपयोग होत असल्याचे मत व्यक्त केले असेल तर जगजाहीर आहे. या एजन्सीचा दुरुपयोग व्हायला लागला आहे.

आघाडीच्या नेत्यांबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न

सरकारशी संबंधित लोकांना बदनाम करण्याचा डाव - सरकार आणि सरकारची संबंधित लोकांना बदनाम करण्यासाठी यंत्रणा वापरली जातात. संशय तयार करणे, काही शंका तयार करण्याचा प्रयत्न करणे यासाठी या एजन्सीचा वापर होत आहे. किरीट सोमैय्या जे बोलतात त्या दोन-चार दिवसात घटना घडतात. त्यामुळे तंतोतंत भविष्य वर्तवणारे व्यक्ती म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख होऊ लागली आहे. एजन्सीज कोणतेही काम करण्याच्या आधी त्यांना कल्पना देतात. त्यांना कल्पना देऊनच या कारवाया होतात, असा एकंदर आभास तयार झाला असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

ईडीकडून संजय राऊत यांची मालमत्ता जप्त- शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut Property Seize By ED) यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. राऊत यांची ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याबरोबर ८ भूखंड आणि मुंबईच्या दादर परिसरातील एक फ्लॅट देखील ईडीने जप्त केला आहे. 1034 कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली होती. दरम्यान, संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे.

हेही वाचा-CCTV : नांदेड शहरात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळी घालून हत्या; गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद

हेही वाचा-Sanjay Raut Property Seize By ED : शिवसेना नेते संजय राऊतांविरोधात ईडीची मोठी कारवाई; ११.१५ कोटींची मालमत्ता जप्त

हेही वाचा-Dilip Walse Patil Reaction : केंद्राची सूडबुद्धीने कारवाई, मात्र राज्य सरकारला धोका नाही - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Last Updated : Apr 5, 2022, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.