ETV Bharat / city

डोंगरी दुर्घटना म्हणजे सरकारच्या अनास्थेचे बळी आहेत; जयंत पाटील व मिलींद देवरांची टीका - जयंत पाटील

मुंबईमधील डोंगरी परिसरातील केसरबाई ही १०० वर्षे जुनी इमारत सकाळी कोसळली. यावेळी ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणी काँग्रेसचे मिलींद देवरा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

डोंगरी दुर्घटना म्हणजे सरकारच्या अनास्थेचे बळी आहेत; जयंत पाटील व मिलींद देवरा
author img

By

Published : Jul 16, 2019, 5:24 PM IST

मुंबई - शहरातील डोंगरी परिसरातील केसरबाई ही १०० वर्षे जुनी इमारत सकाळी कोसळली. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. NDRF आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणी काँग्रेसचे मिलींद देवरा यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील व मिलींद देवरा यांची प्रतिक्रिया

सरकार जनतेच्या जीवाची काळजी घेण्यात अपयशी - जयंत पाटील

पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईसह महाराष्ट्रात किड्यामुंग्यासारखी लोक मरत आहेत. अधिवेशनात धोकादायक इमारती मोकळ्या करण्याचे आदेश देऊनही कार्यवाही न केल्याने या दुर्घटना घडत आहेत. या सर्व घटनांसाठी सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, अशी टीका पाटील यांनी केली. यावेळी जखमींवर तातडीने उपचार व्हायला हवेत. तसेच दोषींवर सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सरकार निवडणूकीत व्यस्त - मिलींद देवरा

काँग्रेसचे नेते मिलींद देवरा यांनी घटना स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी पालिकेच्या हलगर्जीपणाबद्दल सरकारला जाब विचारला. सरकार हे निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त आहे. पालिकेकडून दरवर्षी इमारतींचे ऑडीट होणे आवश्य आहे. परंतु सरकार असे काणतेही काम करताना दिसत नाही. यामुळे अशा घटना घडत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

Intro:nullBody:MH_MUM_03_JAYANT_PATIL_DONGRI_VIS_MH7204684

डोंगरी दुर्घटना; सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष: जयंत पाटील
मुंबई: पावसाळा सुरु झाल्यापासून मुंबई सह महाराष्ट्रात किड्यामुंग्यासारखी लोकं मरत आहे. आधिवेशनात धोकादायक इमारती मोकळ्या करण्याचे आदेश देऊनही कार्यवाही न केल्यानं या दुर्घटना घटत असून सरकार सर्वस्वी जबाबदार असल्याची टिका राष्ट्रवादीचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
पाटील म्हणाले,
डोंगरी येथे इमारत कोसळून ५०+ अधिक नागरिक दबल्याची शक्यता आहे. यामुळे जनतेच्या जीविताची काळजी घेण्यात सरकार अपयशी ठरतंय हे सिद्ध झाले आहे. जखमींवर तातडीने उपचार व्हायला हवेत तसेच दोषींवर सरकारने कडक कारवाई करावी. जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.