ETV Bharat / city

जावेद अख्तर म्हणाले, ''मी नास्तिक आहे, पण माझी मान शरमेने खाली गेली..'' - संवाद लेखक जावेद अख्तर

कर्नाटक सरकाराच्या आदेशाने बंगळूरू पोलिसांनी येशू ख्रिस्ताचा पुतळा हटवण्यात आला. याला ट्विटरवरुन प्रतिक्रिया जावेद अख्तर यांनी दिली आहे.

Javed Akhtar
जावेद अख्तर
author img

By

Published : Mar 7, 2020, 5:46 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे प्रसिध्द गीतकार आणि संवाद लेखक जावेद अख्तर आपल्या सोशल मीडियावरील लिखानाने नेहमीच चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी केलेले ट्विट लोकांचे लक्ष वेधत आहे. कर्नाटक सरकारने बंगळूरमधील येशूचा पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांनी हा पुतळा क्रेनच्या सहाय्याने हटवला आहे. यामुळे जावेद अख्तर संतापले आहेत. त्यांनी याबद्दल केलेले ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

  • Although I am an Athiest I hang my head in shame as an Indian that near Banglore a statue of Jesus was removed with a crane by the police following the orders of Karnataka Govt.

    — Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बंगळुरुमध्ये पोलिसांनी येशू ख्रिस्ताचा पुतळा क्रेनने हटवल्यानंतर जावेद अख्तर यांनी आपली प्रतिक्रिया देताना ट्विटरवर लिहिलंय, ''मी नास्तिक असलो तरी एक भारतीय असण्याच्या नात्याने माझी मान शरमेने खाली गेली. कर्नाटक सरकारच्या आदेशाने बंगळूरू पोलिसांनी येशूचा पुतळा क्रेनने हटवला.''

जावेद अख्तर नेहमीच आपली सामाजिक मते सडेतोडपणे मांडत असतात. त्यांनी नागरिकता संशोधन कायदा, एनपीआर (NPR) आणि एनआरसी (NRC) ला आपला विरोध दर्शवला होता. सीएएच्या विरोधात त्यांनी उघडपणे आपला विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी येशूच्या पुतळा हटवण्याच्या पोलिसांच्या कृतीवर केलेली टीका माध्यामात चर्चेचा विषय झाली आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.