ETV Bharat / city

जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्य गीत म्हणून घोषित करणार - लवकरच याबाबत घोषणा करणार

जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्य गीत म्हणून घोषित करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. लवकरच याबाबत घोषणा करणार असल्याचे मुनगुंटीवार यांनी सांगितले.

जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा
author img

By

Published : Oct 18, 2022, 4:26 PM IST

Updated : Oct 18, 2022, 7:41 PM IST

मुंबई - जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्य गीत म्हणून घोषित करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. लवकरच याबाबत घोषणा करणार असल्याचे मुनगुंटीवार यांनी सांगितले. तसेच, आधीचे जूने गीत दोन कडवे कमी केले जाणार असल्याचही मुनगंटीवारांनी सांगितले आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्य गीत म्हणून घोषीत करण्याचा विचार सरकारच्यावतीने केला जात असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून जय जय महाराष्ट्र माझा, बहु असोत सुंदर संपन्न की महान आणि मंगल देशा पवित्र देशा या तीन गाण्यांचा पर्याय होता. यात जय जय महाराष्ट्र माझा या गीताचा निवड करण्यात आली आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याअगोदर सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलण्याची घोषणा केली होती. दरम्यान, राष्ट्रगीत हे 52 सेकंदाचं आहे. जय जय महाराष्ट्र हे गीत मूळ शब्द बदलले जाणार नाहीत याची काळजी घेत 1.15 ते 1.30 मिनिटांत बसेल असे नियोजन केले जात आहे. कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गाणे गायले जाईल आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता होईल अशी माहितीही मुनगंटीवर यांनी दिली आहे.

जय जय महाराष्ट्र या गाण्यातून महाराष्ट्र राज्याचा इतिहास, संस्कृती आणि उत्सवांच कौतुक होईल, असे सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटले आहे. सध्या देशातील 11 राज्यांचे स्वत:चे गीत आहे. जय जय महाराष्ट्र गीताला मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्राचाही या राज्यांच्या पंक्तीत समावेश होईल. हे गीतकवी रादा बधे यांनी लिहिले असून श्रीनिवास खळे यांनी संगीत दिले आहे. तर, शाहीर साबळे यांनी हे गीत गायलं आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं त्यावेळी मुंबईतल्या दादरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. यावेळी शाहीर साबळे यांनी हे गीत सादर केले होते.

Last Updated : Oct 18, 2022, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.