ETV Bharat / city

Jackie Shroff : 'ए भिडू, जिंदगी को हलके में नही लेने का'; जॅकी श्रॉफचे नवोदित कलाकारांना आवाहन - जॅकी श्रॉफ बातमी

नैराश्यातून काही कलाकारांनी आत्महत्या केल्या आहेत. आयुष्य फार मोठे आहे. परंतु, सर्वांचे तिकीट तयार आहे, जीवनाचा आनंद घ्या, असे आवाहन जॅकी श्रॉफ यांनी नवोदित कलाकारांना केले ( Jackie Shroff Appeal Newly Cine Artist ) आहे.

Jackie Shroff
Jackie Shroff
author img

By

Published : Apr 10, 2022, 10:33 PM IST

मुंबई - कोरोना काळात चित्रपटसृष्टीशी निगडित अनेक मग ते छोटे मोठे कलाकार सर्वांना यांना फटका बसला आहे. त्यातून नैराश्यातून काही जणांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी नवोदित कलाकारांना सल्ला दिला आहे. आयुष्य फार मोठे आहे. परंतु, सर्वांचे तिकीट तयार आहे, जीवनाचा आनंद घ्या. आयुष्य हे फार सुंदर असून त्याला इतक्या सहजतेने संपवू नका, असे आवाहन श्रॉफ यांनी केले ( Jackie Shroff Appeal Newly Cine Artist ) आहे.

भाजपा मुंबई चित्रपट नाट्य आघाडीतर्फे चित्रपट, टेलिव्हिजन, ओटीटी या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मुंबई दादर येथील प्रदेश कार्यालयात करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, शिव ठाकरे, अभिनेत्री क्रांती रेडकर तसेच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार उपस्थित होते. याप्रसंगी जॅकी श्रॉफ यांनी नवोदित युवक- युवतींना जगण्याचा कानमंत्र दिला.

जॅकी श्रॉफ प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

जॅकी श्रॉफ म्हणाले की, या चित्रपटसृष्टीशी निगडीत क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने नवोदित कलाकार विशेषकरून कॉलेजमधील युवक-युवती असेच नाट्य, डान्स यामध्येसुद्धा काम करण्यासाठी अनेक जण इथे आले होते. चित्रपट या क्षेत्रामध्ये येण्याबद्दल इच्छुकांची संख्या इतक्या प्रमाणात असल्याबद्दल त्यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. परंतु, निराश न होता आयुष्याला सामोर जावे, असा प्रेमाचा सल्लाही दिला. तसेच, योग शरीरासाठी अतिशय महत्वाचे असून ते सर्वांनी केलंच पाहिजे. त्याने मानसिक ताण दूर होण्यास मदत होते, असेही श्रॉफ यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - Amruta Fadnavis : महाविकास आघाडी जगातील सर्वात भ्रष्ट सरकार; अमृता फडणवीसांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.