मुंबई - परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीयांच्या घरावर 24 तासाहून अधिक वेळापासून आयकर विभागाची छापेमारी (Income Tax Raid) सुरू आहे. शिवसेना पदाधिकारी संजय कदम (IT Raid on Sanjay Kadam) यांच्या अंधेरी येथील घरावर छापेमारी सुरू आहे. 24 तास उलटून गेले असून, अजूनही ही कारवाई सुरू आहे.
संजय कदम हे मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबईतील अंधेरी विभागातील ते एक पदाधिकारी आहेत. मंगळवारी सकाळपासून आयटी विभागाने संजय कदम यांच्या अंधेरीतील घरावर छापा टाकला होता. मुंबई, पुण्यासह 40 हून अधिक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली.