ETV Bharat / city

Income Tax Raid : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्तांवर आयकर विभागाची टाच, हवालामार्गे पैशांचा व्यवहार झाल्याचा संशय

author img

By

Published : Apr 8, 2022, 9:53 AM IST

Updated : Apr 8, 2022, 10:45 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता केंद्रीय तपास यंत्रणांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांचा फ्लॅट आणि प्लॉटवर जप्तीच्या कारवाईनंतर आता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या मालमत्तेवर टाच आणल्याची माहिती आहे

Yashwant Jadhav
आयकर विभागाची यशवंत जाधव यांच्यावर कारवाई

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता केंद्रीय तपास यंत्रणांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांचा फ्लॅट आणि प्लॉटवर जप्तीच्या कारवाईनंतर आता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या मालमत्तेवर टाच आणल्याची माहिती आहे ( IT department attached about 41 properties of Shiv Sena leader Yashwant Jadhav ). यशवंत जाधव यांच्याकडून हवालामार्गे काही व्यवहार झाल्याची माहिती आहे, त्याआधारावर आयकर विभाग चौकशी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • Mumbai | I-T department attached about 41 properties of Shiv Sena leader & BMC standing committee chairman Yashwant Jadhav

    Some payments were made to tenants through hawala. This area is under investigation & is suspected.

    — ANI (@ANI) April 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आयकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्या भायखळ्यातील २६ सदनिका आणि वांद्रे येथील ५ कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट जप्त केल्याची माहिती आहे. त्यासोबतच जाधव यांच्याशी संबंधीत भायखळा येथील इम्पेरियल हॉटल, न्यूज मल्टिमीडिया प्रा. लिमिटेडशी संबंधीत संपत्ती जप्त करण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे. यशवंत जाधव आणि शिवसेनेलाच हा मोठा धक्का मानला जात आहे.

फेब्रुवारीमध्ये पडला होता आयकरचा छापा, दोन दिवस चौकशी - भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लाँड्रिंग ( Money Laundering ) आणि शंभर कोटींचा घोटाळा ( Hundred Crore Scam ) केल्याचा आरोप केला होता. सोमैया यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडे यशवंत जाधव यांची तक्रार केली होती. या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यात छापेमारी झाली होती. दरम्यान, यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. तर यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी निवडणुकीत चुकीची माहिती दिल्याने निवडणूक आयोगाकडे त्यांच्यासंबंधीची तक्रार दाखल झाली होती. आयोगाने हे प्रकरण आयकर विभागाकडे दिले होते. त्यानुसार आयकर विभाग कारवाई करत असल्याची माहिती महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे ( BJP Group Leader Prabhakar Shinde ) यांनी दिली होती.

100 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप - मिळालेल्या माहितीनुसार यशवंत जाधव यांच्या भायखळ्यात 26 फ्लॅट्सवर जप्तीची कारवाई झाली असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच बांद्रा येथील 5 कोटी रुपयांचा फ्लॅट्स देखील जप्त करण्यात आला आहे. यशवंत जाधव यांच्या मालकीच्या काही मालमत्ता नातेवाईकांच्या माध्यमातून चालवल्या जात होत्या, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यशवंत जाधव यांच्या नातेवाईकालाही समन्स पाठवण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यात यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर चार दिवस त्यांची चौकशी सुरु होती. जाधव आणि त्यांची पत्नी यामिनी जाधव यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे.

यशवंत जाधव यांनी न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून भायखळ्यातल्या बिलकाडी चेंबर्समध्ये 31 फ्लॅट खेरदी केल्याचा आरोप केला जात आहे. इमारतीच्या चार ते पाच भाडेकरूंना 30 ते 35 लाख रुपये दिल्याचा बोलले जाते. हवालाच्या माध्यमातून हे पैसे दिल्याचा संशय आहे. त्याचवेळी आयकर विभागाने इतर 40 मालमत्तांचा तपास सुरु करत अखेर जप्तीची कारवाई केली आहे.

काय आहे प्रकरण - यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एक डायरी मिळाली होती. यात त्यांच्या व्यवहारांची पोलखोल झाली होती. त्यात निवासी इमारतीतील भाडेकरुंनी हक्क संपादन करण्यासाठी सुमारे 10 कोटी रोख दिले. गुढीपाडव्याला 'मातोश्री'ला 2 कोटींचे पेमेंट केले. 'मातोश्री'ला 50 लाखांचे घड्याळ पाठवले. असे उल्लेख होते. याबाबत आयकर विभागाने जाधवांकडे चौकशी केली असता, त्यांनी डायरीतील 'मातोश्री' म्हणजे माझी आई असल्याचे सांगितले होते. आपल्याला दानाची 2 कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती. याचा वापर आपण हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी भेटवस्तू देण्यासाठी केला. माझ्या आईच्या नावावर घड्याळांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला होता, पण मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाचे नावही 'मातोश्री' असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा : Sanjay Raut in Mumbai : संजय राऊतांचे मुंबईत जंगी स्वागत; शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन; सोमैयांविरोधात आक्रमक

Last Updated : Apr 8, 2022, 10:45 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.