ETV Bharat / city

Ashish Shelar फॉक्सकॉन वेदांत प्रकरणी तत्कालीन सरकारने काय केले, याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ashish Shelar फॉक्सकॉन वेदांत प्रकरणी तत्कालीन आघाडी सरकारने आणि उद्योग मंत्र्यांनी किती बैठका घेतल्या ? हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून आघाडी सरकारने त्या काळात काय प्रयत्न केले ? याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, अशी मागणी भाजपा नेते आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्याकडे केली आहे.

Ashish Shelar
Ashish Shelar
author img

By

Published : Sep 14, 2022, 8:55 PM IST

मुंबई फॉक्सकॉन वेदांत प्रकरणी तत्कालीन आघाडी सरकारने आणि उद्योग मंत्र्यांनी किती बैठका घेतल्या ? हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून आघाडी सरकारने त्या काळात काय प्रयत्न केले ? याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, अशी मागणी भाजपा नेते आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्याकडे केली आहे.

दूध का दूध, पाणी का पाणी फॉक्सकॉन वेदांत हे प्रकल्प महाराष्ट्रात आले नाहीत यावरून युती सरकारला लक्ष करणाऱ्या तत्कालीन उद्योग मंत्री आणि पर्यावरण मंत्री यांना कोंडीत पकडत आमदार आशिष शेलार यांनी जोरदार पलटवार केला. या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी, निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून तत्कालीन आघाडी सरकारने किती बैठका घेतल्या ? त्याचे इतिवृत्तांत आहे का ? प्रकल्पाला सबसिडी देण्यासाठी त्यावेळी उद्योग विभागाने काय विचार केला होता ? वेदांतच्या प्रतिनिधिंशी किती बैठकी घेतल्या ? याच कंपन्यांच्या माणसांना गुजरात मध्ये किती वेळा बोलावलं गेलं ? त्यांनी काय सवलती देण्याचे मान्य केले, आपण किती सवलती देण्यासाठी तयारी दाखवली या सगळ्याचा चौकशी अहवाल येऊ दे. म्हणजे जनतेसमोर दुध का दुध पाणी का पानी होऊ द्या, अशी आग्रही भूमिका आमदार आशिष शेलार यांनी घेतली आहे.

देशाच्या यशावर विरजण टाकण्याचे काम भारतातील सेमीकंडक्टरची बाजारपेठ २०२० मध्ये १५ अब्ज डॉलर इतकी होती. ही बाजारपेठ २०२६ पर्यंत ६३ अब्ज डॉलर इतकी होण्याचा अंदाज आहे. तैवान, चीनसारख्या मोजक्याच देशांमध्ये सेमीकंडक्टरची निर्मिती केली जाते. आगामी डिजीटल तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता सेमीकंडक्टरला मोठी मागणी असणार आहे. चीन-तैवानमधील तणाव, कोरोना महासाथ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला होणाऱ्या सेमीकंडक्टर पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मोठा प्रकल्प भारतात यावा यासाठी तत्काळ प्रयत्न केले त्याला यश आले या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि आपल्या देशाच्या यशावर विरजण टाकण्याचे काम आमदार आदित्य ठाकरे आणि त्यांची सेना करीत आहे, असा सनसनाटी आरोप ही आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच प्रकल्‍पाबाबत मगरीचे अश्रू ढाळून याकूबच्‍या कबरीचा विषय सेनेला झाकता येणार नाही, असा टोलाही आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.