ETV Bharat / city

Face to Face Hasan Mushrif : 'विरोधकांना त्यांच्याच पद्धतीने उत्तरे देणार, तर सरकार पडण्याचे दावे फोल'

भाजपाने अनेक आघाड्यांवर राज्य सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा ( Central Investigation Agency ) दबाव आणत राज्यातील अनेक नेत्यांना लक्ष केले जात आहे. मात्र, विरोधकांच्या या प्रयत्नांना तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याची तयारी आता आम्ही केली आहे, अशी माहिती राज्याचे कामगार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी दिली आहे.

Hasan Mushrif
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
author img

By

Published : Dec 1, 2021, 9:28 AM IST

Updated : Dec 2, 2021, 10:44 AM IST

मुंबई - राज्यातील विरोधक असलेल्या भाजपाने अनेक आघाड्यांवर राज्य सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा ( Central Investigation Agency ) दबाव आणत राज्यातील अनेक नेत्यांना लक्ष केले जात आहे. मात्र, विरोधकांच्या या प्रयत्नांना तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याची तयारी आता आम्ही केली आहे, अशी माहिती राज्याचे कामगार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी दिली आहे.

विरोधकांना त्यांच्याच पद्धतीने उत्तरे देणार, तर सरकार पडण्याचे दावे फोल

राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने केलेल्या विविध कामांचा उल्लेख त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ( Face to Face Hasan Mushrif ) केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तसेच विविध आपद्ग्रस्तांना आतापर्यंत सुमारे 21 हजार कोटी रुपयांची मदत केल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामविकास विभागाच्या ( Rural Development Department ) माध्यमातून राज्यातील पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे. तर कामगाराभिमुख विविध कायदे आणि नियम केले जात असून असंघटित कामगारांसाठी विविध महामंडळ स्थापून त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्यावतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी राज्य सरकारमध्ये अंतर्विरोध असून त्यामुळे हे सरकार पडेल हा केलेला दावा सपशेल खोटा असून अशी कोणतीही परिस्थिती सरकारमध्ये नाही. उलट हे सरकार पडणार नाही याची खात्री झाल्याने त्यांनी असे दावे करण्यास सुरुवात केल्याचं मुश्रीफ यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

Last Updated : Dec 2, 2021, 10:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.