मुंबई - मंत्रालय हे महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख वास्तू आहे. संपूर्ण राज्याचा गाडा येथून हाकला जातो. आज मंत्रालयातील काही विभागात इंटरनेट सुविधा वीस मिनीटसाठी खंडित झाला. प्रशासकीय कामकाजावर याचा विपरीत परिणाम झाल्याने अनेक कामे खोळंबली.
सरकारी कामात इंटरनेट हा अविभाज्य घटक मानला जातो. सरकारच्या अनेक योजना ऑनलाईन पध्दतीने चालतात. कुठलेही काम इंटरनेट सेवेशिवाय चालतच नाही. मंत्रालयातून राज्य सरकारचा प्रशासकीय विभागाचे कामकाज चालतो. मंत्र्यांची, राज्याच्या विविध खात्यातील मुख्य सचिव, अपर सचिवांची, अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची दालने आहेत. आज मंत्रालयातील काही विभागातील इंटरनेट सेवा सुमारे २० मिनिटंसाठी ठप्प झाली. परिणामी कामकाज खोळंबले आहे. आयटी विभागाने सुमारे 15 ते 20 मिनिटानी सेवा पूर्ववत केली. मात्र दिवसभर इंटरनेट धीम्या गतीने चालत होते. रात्री उशिरापर्यंत इंटरनेट बंद होण्याचे समजू शकलेले नाही. यापूर्वी ही मंत्रालयातील वीज पुरवठा बंद झाला होता.
हेही वाचा - मुंबई : भांडुप मार्गालगत असणाऱ्या झाडाझुडुपांना लागली आग