ETV Bharat / city

BMC 100 Crore Scam : मुंबई महापालिकेत १०० कोटींचा घोटाळा.. विरोधी पक्षनेत्यांचा आरोप

मुंबई महानगरपालिकेत विरोधकांकडून नेहमीच घोटाळ्यांचा आरोप केला ( Scams In BMC ) जातो. या घोटाळ्याच्या आरोपात आता नवीन घोटाळ्याची भर पडली आहे. पालिकेचे विरोधीपक्षनेते रवी राजा ( Opposition Leader Ravi Raja ) यांनी पे अँड पार्कच्या कंत्राटात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला ( BMC 100 Crore Scam ) आहे.

रवी राजा
रवी राजा
author img

By

Published : Jan 12, 2022, 4:37 AM IST

मुंबई - मुंबईमधील पार्किंगची ( Parking In Mumbai ) समस्या सोडवण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी पे अँड पार्किंग कंत्राट दिले ( BMC Pay Park Scam ) आहेत. यातील कित्येक कंत्राटांचा कालावधी संपला आहे, तर काही ठिकाणी महिला बचतगटांना देण्यात आलेली कंत्राटे सब कंत्राटदाराला देण्यात आली आहेत. पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने १०० कोटींचा महसूल बुडत असून पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. या १०० कोटींच्या घोटाळ्याला ( BMC 100 Crore Scam ) दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालिकेतील विरोधीपक्षनेते रवी राजा ( Opposition Leader Ravi Raja ) यांनी आज ऑनलाईन पालिका सभागृहात केली.

मुंबई महापालिकेत पुन्हा १०० कोटींचा घोटाळा.. विरोधी पक्षनेत्यांचा आरोप

१०० कोटींचा घोटाळा

मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्कबाबत रवी राजा यांनी पालिकेच्या ऑनलाईन सभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना पे अँड पार्कमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप केला आहे. मुंबई महापालिकेची शहर आणि उपनगरात सुमारे ७५० ते ८०० पे अँड पार्क आहेत. महिलांना सक्षम करावे यासाठी यातील २५ ते ३० टक्के पे अँड पार्क महिला बचतगटांना देण्यात आले आहेत. महिला बचतगटांना जे पे अँड पार्क दिले आहेत त्या बहुतेक ठिकाणी सब कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. विशेष करून एकाच कंत्राटदाराने महिला बचतगटांचे पे अँड पार्क चालवण्यास घेतले आहेत. यामुळे जो पैसा महिलांना जायला हवा तो पैसा सब कॉन्ट्रॅक्टरला जात आहे. पालिकेच्या २४ वॉर्डपैकी ८ ते ९ वॉर्डमध्ये पे अँड पार्कचे कंत्राट संपले आहे. त्याठिकाणी नवे कंत्राट काढण्यात आलेले नाही. जुने कंत्राटदार आणि पालिकेचे अधिकारी मिळून पे अँड पार्कच्या पैशांनी आपली घरे भरत आहेत. यामुळे पालिकेला वर्षाला जे १०० कोटींचे उत्पन्न मिळायला हवे ते कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहेत. पालिकेच्या पे अँड पार्कमध्ये एकाच व्यक्तीची वर्षानुवर्षे मक्तेदारी आहे. पे अँड पार्कचे कोणतेही कंत्राट याच व्यक्तीला मिळते. यामध्ये अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला.

महापौरांकडून गंभीर दखल

या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) यांनी, आपल्याकडे पालिकेच्या पे अँड पार्किंग कंत्राट कामांबाबत काही तक्रारी आल्याचे सांगितले. आपण स्वतः काही ठिकाणी अचानक धाडी घालून कामांची झाडाझडती घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले. पालिका प्रशासनाने पालिका पे अँड पार्किंग प्रकरणी माहिती घेऊन सभागृहाला अहवाल सादर करावा, असे आदेश देत रवी राजा यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

या विभागात घोटाळा

ए', 'के/पश्चिम', 'पी/ उत्तर ', ' पी/दक्षिण' वार्ड अशा एकूण ९ ते १० विभागात पे अँड पार्कमध्ये घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये काही ठिकाणी महिला बचत गटांचे काम सब कंत्राटदाराला देण्यात आले आहे. यामुळे वर्षाला पालिकेचे १०० कोटींचे नुकसान होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.