ETV Bharat / city

Indrani Mukherjee granted bail : इंद्राणी मुखर्जीला 2 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

प्रसिद्ध उद्योगपती इंद्राणी मुखर्जी ने स्वतःची मुलगी शीना बोरा हिची हत्या ( sheena bora case ) केल्याच्या आरोपात 2017 मध्ये पोलिसांनी तिला अटक केली होती. इंद्राणी मुखर्जी गेल्या अनेक वर्षांपासून भायखळा जेलमध्ये आहे.

Indrani Mukherjee g
इंद्राणी मुखर्जी
author img

By

Published : May 19, 2022, 4:43 PM IST

मुंबई- इंद्राणी मुखर्जीला 2 लाखांच्या जात मुचलक्यावर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. रक्कम भरण्यास 2 महिन्यांचा वेळ मिळावा अशीही मागणी, इंद्रायणीच्या वकीलांनी केला आहे. 7 वर्षांपासून इंद्राणी मुखर्जी जेलमध्ये आहे. त्यामुळे रक्कम भरण्यास वेळ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रसिद्ध उद्योगपती इंद्राणी मुखर्जी ने स्वतःची मुलगी शीना बोरा हिची हत्या ( sheena bora case ) केल्याच्या आरोपात 2017 मध्ये पोलिसांनी तिला अटक केली होती. इंद्राणी मुखर्जी गेल्या अनेक वर्षांपासून भायखळा जेलमध्ये आहे. इंद्राणी मुखर्जी जेलमध्ये असताना देखील आपल्या विविध वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. तसेच हत्याकांडा संदर्भात विविध नवीन नवीन आरोप-प्रत्यारोप देखील पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत इंद्राणी कोणकोणत्या प्रकरणांमध्ये चर्चेत राहिलेली आहे याचा सविस्तर आढावा.

काय आहे प्रकरण - इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. तिचा पहिला पती हा सिद्धार्थ दास. त्रिपुरा येथील टी स्टोअर ओनर असलेला सिद्धार्थ दास हा तिचा पहिला पती होता. सिद्धार्थपासून इंद्राणीला झालेली मुलगी म्हणजे शीना बोरा. नंतर इंद्राणीने कोलकतामधील व्‍यापारी संजीव खन्‍ना याच्‍यासोबत दुसरे लग्‍न केले. इंद्राणीचे तिसरे लग्न झाले ते मीडिया टायकून पीटर मुखर्जींसोबत. या दोघांमध्ये 16 वर्षांचे अंतर होते. इंद्राणीसोबत तिची मुलगी शीना राहातो होती. इंद्राणीने यावेळी पतीसह सर्वांना शीना आपली बहिण असल्याचं सांगितले. अशातच पीटर मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितले जाते. यामुळे इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली. शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती.

शीना बोरा हत्येचा खुलासा - 21 ऑगस्ट 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर खार पोलीस स्टेशनचे अधिकारी दिनेश कदम यांच्या टीमने इंद्राणी शिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. पोलीस चौकशीत श्यामने तो एप्रिल 2012 मध्ये एका मुलीची हत्या करण्यात सहभागी होता असा धक्कादायक खुलासा केला होता. श्यामने पोलिसांना सांगितलं, की 24 एप्रिल 2012 मध्ये शीनाचा गाडीत गळा आवळून खून करण्यात आला. शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने तिची आई इंद्राणी मुखर्जीची मदत केली होती. रायगडमध्ये मृतदेह फेकण्यात आला. यात इंद्राणी मुखर्जीचा पूर्व पती संजीव खन्नाही शामिल होता. अशी माहिती राकेश मारिया पुस्तकात देणात आलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.