मुंबई पोलीस आयुक्तालय आयोजित अमृत महोत्सव अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयकॉनिक वास्तू म्हणून नावजल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीस आकर्षक रोषणाई करण्यात आली असून 16 ऑगस्ट या कालावधीत महापालिका मुख्यालय तिरंगी रंगात झळाळणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालय आयोजित अमृत महोत्सव Amrit Mahotsav मॅरेथॉन पार पडणार आहे.Celebration of Indian Independence in Maharashtra
अमरावती शहरात भव्य रॅलीचे आयोजन स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त अमरावती शहरात आज सकाळी विविध शैक्षणिक संस्थांसह महाविद्यालयांनी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. हर घर तिरंगा, भारत माता की जय, अशा घोषणानी च्या संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या अमरावती शहरातील सर्व महाविद्यालयांनी एकत्रितपणे येऊन भव्य दिव्य रॅली आयोजित केले होते.सकाळी 8 वाजता पंचवटी चौकातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातुन निघालेली रॅली इर्विन चौक रेल्वे स्टेशन मार्गे राजकुमार चौक व तिथून परत महाविद्यालय कडे रवाना झाली. श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इर्विन चौकात पटनाट्य सादर केले. या पटना त्यामधून राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला. तर पात्राला साजेशी वेशभूषा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी केली होती.काही काय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले.
मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि रोटरी क्लब आँफ मुंबईच्या संयुक्त विद्यमाने होणार १०० हून अधिक चिमुरडे हदयरोग मुक्त होणार आहेत. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वाडिया हॉस्पिटलने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सीएमआरएफ आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांसाठी दोन दिवसाचे १२ व १३ आँगस्ट मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या आरोग्य शिबीराचे उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. याप्रंसगी खासदार राहुल शेवाळे अभिनेता शरद पोंक्षे, सयाजी शिंदे सीएमआरएफचे मंगेश चिवटे रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे सचिव आंनद माने आणि वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ मिनी बोधनवाला तसेच रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते.
कोकण यात्रेचा शुभारंभ स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वराज्य भूमी कोकण यात्रा देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वराज्य भूमी कोकण यात्रेचा शुभारंभ समृध्द कोकण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव यांच्या उपस्थितीत रायगडचे प्रवेशद्वार व आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण येथून सुरू करण्यात आले. पेण गागोदे येथील आचार्य विनोबा भावे यांच्या पेण येथील जन्मस्थळ येथे भेट देवून अलिबागच्या दिशेने यात्रा मार्गस्थ झाले.
खडकवासला धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खडकवासला धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. धरणाच्या सांडव्यातुन मुठा नदीच्या पात्रात पडणाऱ्या पाण्याचे विलोभनीय दर्शन होत आहे. ब्रिटिश राजवटीत १८७९ मध्ये खडकवासला धरण बांधण्यात आले. तेंव्हा पासूनच्या १४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच खडकवासला धरण हे विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.
डॉ रजिया कविता संग्रहाचे प्रकाशन सुलताना स्त्रियांच्या अशा असंख्य वेदना आणि एकूणच महिलांच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर भाष्य करणाऱ्या 75 कडव्यांचा कविता संग्रह डॉ रजिया सुलताना यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आज प्रकाशित केल्या. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे पूर्ण झालीत. परंतु आजही महिलांचे प्रश्न मात्र जागच्या जागीच आहेत. समाजाकडून महिलांची होत असणारी कुचंबना आणि तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन 75 वर्षात अजूनही बदललेला नाही. स्त्री घरात आणि बाहेर कुठे सुरक्षित नसल्याची खंत डॉ राजिया सुलताना यांनी त्यांच्या बाया या आपल्या कवितासंग्रहातून मांडली आहे. महिलांचे भावविश्वच जणू त्यांनी आपल्या कवितेमधून अधोरेखित केले आहे.
पुण्यातील पिरंगुट गावांमध्ये 375 फुटा तिरंगा पदयात्रा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यातील पिरंगुट गावांमध्ये 375 फुटा तिरंगा पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेमध्ये ३७५ फूट लांबीचा तिरंगा घेऊन नागरिक सहभागी झालेले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सगळीकडे साजरा होत असताना पुण्यातील पिरंगुट गावांमध्ये 375 फूट लांबीचे तिरंगी पदयात्रा काढून हा महोत्सव साजरा करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थी पिरंगुट भागातील नागरिक कामगार उद्योजक आणि सर्वच लहान थोर मोठे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते कारण 375 फूट तिरंगा हा खाली न पडता हातात धरून दोन्ही बाजूने लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या आणि 375 कोटी हा तिरंगा घेऊन ही पदयात्रा पूर्ण शहरांमध्ये पूर्ण करण्यात आली.