मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या नेतृत्वात भारत जगामध्ये 2022पर्यंत आपलं स्थान मजबूत करणार आहे. ज्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळामध्ये निर्णय घेतले आणि त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था ( PM Modi Decision For Strong Economy ) सुदृढ करण्यासाठी नवीन-नवीन निर्णय घेतले आहेत, त्याच आधारावर 2022मध्ये भारत सर्वात वेगवान अर्थव्यवस्था ( India fastest growing economy ) असलेला देश राहणार आहे, असे वक्तव्य मुंबईतील एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shaha In Mumbai ) यांनी केले आहे.
'लसीकरणासाठी अनेक उपाय योजना' -
कोरोनाकाळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवस-रात्र कोरोना काळानंतर उपायोजना करण्याकरिता नवीन-नवीन निर्णय मंत्रिमंडळ आणि सचिवांसोबत घेतले. त्यामुळे कोरोनानंतर भारतात सर्वाधिक रिकव्हर झालेला देश आहे. जगातील इतर देशांमध्ये अद्यापही कोरोना नियंत्रणात आलेला नाही. मात्र, भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कोरोना भारतातून हद्दपार होत आहे, ज्या प्रमाणामध्ये 130 कोटी जनतेला लसीकरण संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या उपयोजना त्यामुळे हे शक्य होऊ शकले आहे, असे मत अमित शहा यांनी व्यक्त केले.
'पंतप्रधानांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचे आहे' -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ५ ट्रीलियन इकोनमीचे लक्ष आहे. ते पूर्ण करायचं आहे. ते पूर्ण करण्याकरिता सर्वांना एकत्रित येणे गरजेचे आहे. देशाची एकोनोमी वाढल्यानंतर देशाची प्रगती अधिक वेगाने होत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. उद्योगांसाठीसुद्धा पतंप्रधान मोदींनी अनेक योजना सुरू केल्या आहेत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - Omicron In Mumbai : मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचे ४ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा १९ वर