मुंबई- एकीकडे पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांस देशात धुमाकूळ घातला आहे. दुसरकीडे देशात कोरोनाचे रुग्ण ( India corona update ) वाढत आहेत. देशात कोरोनाचे २४ तासांत २०,०३८ रुग्ण ( Corona cases in India ) आढळून आले आहेत. तर ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाचे १,३९,०७३ रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी दर ४.४४ टक्के आहे.मुंबईमध्ये मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. मुंबईमधील ९२ लाख ३६ हजार ५०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. त्यापैकी गेल्या दीड वर्षात मुंबई महानगरपालिकेने लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे उद्दिष्ट पार केले आहे. मात्र ९ लाख ९२ हजार १७७ लाभार्थ्यांना बूस्टर डोस देता आला आहे. ( Corona vaccine ) यामुळे येत्या ७५ दिवसात मुंबईमधील ८२ लाख ४४ हजार ३२३ नागरिकांनी बूस्टर डोस देण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे. यावर केंद्र सरकारची गाईडलाईन आल्यावर बूस्टर डोस दिले जातील असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मुंबईत असे झालेय लसीकरण - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला आहे. हा प्रसार रोखण्यासाठी देशभरात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. ( Provide Free Dose Of Corona Vaccine ) या मोहिमेंतर्गत आतापर्यंत १ कोटी ८ लाख ३० हजार ८६५ लाभार्थ्यांना लसीचा पहिला, ९७ लाख २४ हजार ७०५ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही तर ९ लाख ९२ हजार १७७ लाभार्थ्यांना बूस्टर डोस देण्यात आले आहेत. १२ ते १४ वयोगटातील १ लाख ५८ हजार ३७४ मुलांना पहिला तर ८२ हजार ४९४ मुलांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. १५ ते १७ वयोगटातील ३ लाख ९५ हजार ३०२ मुलांना लसीचा पहिला तर २ लाख ९७ हजार ३२६ मुलांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
मुंबईत गेल्या २४ तासात ११ हजार २४० चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३३९ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ३.०१ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ५३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २० हजार १७२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९७ हजार ७४० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ८०५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १८३६ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३७ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्या स्थिर : मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट
झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती.
रुग्णसंख्येत चढ उतार : मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून १६ जूनला २३६६, २३ जूनला २४७९, ३० जुनला १२६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १ जुलैला ९७८, २ जुलैला ८११, ३ जुलैला ७६१, ४ जुलैला ४३१,५ जुलैला ६५९, ६ जुलैला ६९५, ७ जुलैला ५४०, ८ जुलैला ५३०, ९ जुलैला ४९९, १० जुलैला ३९९, ११ जुलैला २३५, १२ जुलैला ४२०, १३ जुलैला ३८३, १४ जुलैला ३३९ रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा-Mumbai Corona Update : रुग्णसंख्या ४०० च्या खाली,३३९ रुग्णांची नोंद, २ मृत्यू
हेही वाचा-Booster Dose: करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा केंद्राचा निर्णयहेही वाचा-