ETV Bharat / city

Coronavirus Cases in India Today : चिंताजनक! देशात सलग चौथ्या 16 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण, 51 रुग्णांचा मृत्यू

कोरोनाचा देशात विस्फोट झाला आहे. आज 16 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ( corona infection) त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे.

Coronavirus Cases in India Today
Coronavirus Cases in India Today
author img

By

Published : Jul 18, 2022, 9:47 AM IST

मुंबई - देशातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिक वाढताना दिसत आहे. देशात सलग चौथ्या दिवशी 16 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 16 हजार 935 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात 51 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात 2186 नवे कोरोनाबाधित - महाराष्ट्रात 2 हजार 186 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 3 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारीच्या तुलनेत रविवारी 11 रूग्णांची वाढ झाली आहे. शुक्रवारी राज्यात 2 हजार 371 रूग्णांची नोंद झाली होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 2 हजार 853 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 78,53,661 रूग्ण करोनातून मुक्त झाले आहेत.

कोरोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा केंद्राचा निर्णय - मुंबईमध्ये मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. मुंबईमधील ९२ लाख ३६ हजार ५०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. त्यापैकी गेल्या दीड वर्षात मुंबई महानगरपालिकेने लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे उद्दिष्ट पार केले आहे. मात्र ९ लाख ९२ हजार १७७ लाभार्थ्यांना बूस्टर डोस देता आला आहे. ( Corona vaccine ) यामुळे येत्या ७५ दिवसात मुंबईमधील ८२ लाख ४४ हजार ३२३ नागरिकांनी बूस्टर डोस देण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे. यावर केंद्र सरकारची गाईडलाईन आल्यावर बूस्टर डोस दिले जातील असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

काय केलीय केंद्र सरकारने घोषणा - भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (७५ वर्ष) साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १५ जुलै पासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

कोरोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 25 हजार 709 - देशात गेल्या 24 तासांत 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 25 हजार 709 वर पोहोचला आहे. रविवारी दिवसभरात 17 हजार 790 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 30 लाख 81 हजार 441 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 449 इतकी आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.33 टक्के आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.47 टक्के आहे.

हेही वाचा - Nagpur Corona Update : पालकांची चिंता वाढली! नागपुरातील एकाच शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.