मुंबई - शिवसेना सत्ता स्थापनेत अधिकाधिक अपक्ष उमेदवार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार आज साक्री विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी मातोश्रीवर जावून शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा - सरकार स्थापनेवेळी शिवसेना आमच्यासोबत राहील - रावसाहेब दानवे
मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याचे अधिकृत पत्र त्यांनी दिलं. शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्यासोबत मंजुळा गावित यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मंजुळा गावित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या पाठिंब्यामुळे शिवसेना समर्थकांच्या आमदारांची संख्या आता 62 वर पोहचली आहे.
हेही वाचा - मुंबईत भाजप विधिमंडळ नेता निवड बैठक; काय असणार उद्धव ठाकरेंची भूमिका?