ETV Bharat / city

Indian Independence Day : मुंबईचे शिल्पकार; जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट - द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे

मुंबईच्या जडणघडणीत ज्यांचा सहभाग आहे त्यापैकी जगन्नाथ शंकरशेट मुर्कुटे (Nana Shankarshet) हे एक आहेत. त्यांना नाना शंकरशेट नावाने ओळखले जाते. नानांनी मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेकविध अशा लोककल्याणकारी सुधारणांचा पाया घातला. एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे त्यांना मुंबईचे शिल्पकार ( Sculptor from Mumbai) "मुंबईचे जनक" अशी उपाधी देण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्य दिना (Indian Independence Day) निमीत्त या शुराला सलाम (Saluting Bravehearts ) .

Nana Shankarshet
नाना शंकरशेट
author img

By

Published : Aug 9, 2022, 7:35 PM IST

मुंबई: जगन्नाथ शंकरशेट (Nana Shankarshet) यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावी ब्राह्मण व्यापारी कुटुंबात झाला. त्यांचे वडील व्यापारासाठी मुंबईस आले. त्यांच्या वडिलांनी व्यापारामध्ये मोठी संपत्ती मिळवली होती. पूर्वजांप्रमाणे त्यांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. अनेक अरब, अफगाणी तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेट यांच्या हवाली करीत. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातील मुंबईत सार्वजनिक जीवनात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले.

सामाजिक कार्यामध्ये योगदान: या कार्यात त्यांना अनेक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला तसेच सार्वजनिक कामांकरीता खर्च करून टाकला. जगन्नाथ शंकरशेट यांच्या वडिलांना म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू सुलतान विरुद्ध इंग्रज (Tipu Sultan vs British) यांच्यामधील युद्धात मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला होता. जगन्नाथ शंकरशेट यांची आई भवानीबाई त्यांच्या लहानपणीच वारल्या. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली. नानांचे वडील १८२२ मध्ये वारले व तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली.

शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य : जगन्नाथ शंकरशेट यांच्यावर सर जमशेटजी जिजीभाईं (Jamshetji Jijibhai) यांची छाप पडली होती. हिंदवासियांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एल्‌फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळ काढले. त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हिचे १८२४ मध्ये बॉंम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले. एल्‌फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एल्‌फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त होते. या संस्थेचे एल्‌फिन्स्टन कॉलेज झाल्यावर १८३७ मध्ये त्याला एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणून ओळख मिळाली. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन सभासदांमध्ये सतत सोळा वर्षे नाना निवडून आले. स्ट्यूडंट्‍स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी (१८४८) आणि जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा (१८४९) या त्यांनी स्वतःच्या वाड्यात चालू केल्या.

फर्स्ट ग्रेड ॲंग्लो व्हर्नाक्युलर स्कूल : १८५७मध्ये द जगन्नाथ शंकरशेट फर्स्ट ग्रेड ॲंग्लो व्हर्नाक्युलर स्कूल (First Grade Anglo Vernacular School) सुरू केले. १८५५मध्ये त्यांनी विधी महाविद्यालय सुरु केले. सर ग्रॅंटच्या मृत्यूनंतर ग्रॅंट मेडिकल कॉलेजची १८४५ मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षण मराठीमध्ये देण्याची सोय त्यांनी केली. अ‍ॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिऑग्रॅफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष पद नाना शंकरशेट यांनी भूषवले होते. १८२३ साली ब्रिटिश पार्लमेंटकडे सती या अमानुष प्रथेवर बंदी आणण्यासाठी एक अर्ज केला गेला. त्यावर राजा राममोहन रॉय आणि नाना शंकरशेट यांच्या प्रामुख्यानं सह्या होत्या. पुढे म्हणजे १८२९ साली ज्यावेळी सती चालीस बंदी घालणारा कायदा आणला गेला, त्यावेळी नाना शंकरशेट यांनी त्याला जाहीर पाठिंबा दिला होता. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत त्यांनी सक्रिय भाग घेतला.

सामाजिक कार्य : नाना शंकरशेट यांचे चे सामाजिक कार्यही मोठे आहे. १८५२मध्ये "द बॉंबे असोसिएशन" स्थापण्यात त्यांचा पुढाकार होता. मुंबई कायदे मंडळाच्या सुरुवातीच्या सभासदांमध्ये ते प्रमुख होते. सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास त्यांनी पाठिंबा दिला होता. ग्रॅंड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस (Justice of the Peace) अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. मुंबई महानगरपालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गॅंस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे.जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली. त्यांनी मुंबई-ठाणे रेल्वेची सुरुवात केली. नानांचे वयाच्या बासष्टाव्या वर्षी मुंबईत देहावसान झाले.

भारतीय रेल्वेचे जनक: सप्टेंबर १८३० मध्ये इंग्लंडमधील लिव्हरपूल ते मँचेस्टर या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाची माहिती नाना शंकरशेट यांना समजली आणि त्यांनी अशी गाडी आपल्या शहरातही हवी, असा ध्यास घेतला. मुंबईत रेल्वे सुरू करण्याची संकल्पना पहिल्यांदा नानांनी त्यांचे मित्र जमशेटजी जिजिभोय यांच्याकडे मांडली. या दोघांनी मिळून १८४५ साली ‘इंडियन रेल्वे असोसिएशन’ची स्थापना केली. या माध्यमातून ते तत्कालीन ब्रिटिश सरकारला रेल्वे सुरू करण्यासाठी विविध प्रकारे समजवू लागले. त्याचाच परिपाक म्हणजे, १ ऑगस्ट १८४९ रोजी ‘द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे’ (The Great Indian Peninsula Railway) ची स्थापना झाली. त्यांच्या अथक प्रयत्नांतून १६ एप्रिल १८५३ रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावर धावली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘भारतीय रेल्वेचे जनक’ म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा : 75 years of India independence : न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात स्वातंत्र्याची ७५ वर्षा निमित्त विविध कार्यक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.