मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि सपाचे खासदार जया बच्चन यांनी ड्रग्जच्या वादाविरोधात संसदेत निवेदन दिल्यानंतर मुंबईत त्याच्या घराबाहेर खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्ज कनेक्शनच्या मुद्दय़ावर जया बच्चन यांनी संसदेत सांगितले, की बॉलिवूड इंडस्ट्रीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानंतर, जुहूमध्ये असलेल्या त्यांच्या 'जलसा' या बंगल्याबाहेर मुंबई पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा पुरविली आहे.
समाजवादी पक्षाच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी मंगळवारी संसदेत अभिनेता-राजकारणी रवी किशन यांच्या विधानावर निशाणा साधला होता. जया बच्चन म्हणाल्या की, सोशल मीडियावर फिल्म इंडस्ट्री खराब झाली आहे.
यापूर्वी सोमवारी गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन म्हणाले होते की, बॉलिवूड देखील ड्रग्सच्या व्यसनाचा बळी आहे.