ETV Bharat / city

BMC : हिंदमाता पूरमुक्त करण्यासाठी वाढीव ६० कोटींचा खर्च!

हिंदमाता परिसराला पूरस्थितीपासून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मायक्रोटनेलिंग, पर्जन्य जलवाहिन्या टाकणे व नाल्याच्या भिंतीची पुनर्बांधणी आदी कामे केली जात आहेत. त्यासाठी पालिका ८३ कोटी रुपये खर्च करणार होती. मात्र या कामांत काही बदल झाल्याने आता त्यापोटी पालिकेला अतिरिक्त ६० कोटींचा खर्च येणार आहे.

author img

By

Published : Nov 16, 2021, 10:12 PM IST

bmc
बीएमसी फाईल फोटो

मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची(Mumbai Rain) तुंबई होते. थोड्या पावसातही हिंदमाता, सायन, किंग सर्कल आदी भागात पाणी साचते. यावर उपाय म्हणून दादर हिंदमाता परिसर पूरमुक्त (Dadar Hindmata Area) करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. हिंदमाता परिसराला पूरस्थितीपासून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मायक्रोटनेलिंग, पर्जन्य जलवाहिन्या टाकणे व नाल्याच्या भिंतीची पुनर्बांधणी आदी कामे केली जात आहेत. त्यासाठी पालिका ८३ कोटी रुपये खर्च करणार होती. मात्र या कामांत काही बदल झाल्याने आता त्यापोटी पालिकेला अतिरिक्त ६० कोटींचा खर्च येणार आहे. मात्र ही वाढीव कामे सदर कंत्राटदाराला वेगळे नवीन टेंडर न काढता देण्यात आले आहेत.

हिंदमाता पूरमुक्त -

मुंबईत कमी वेळात जास्त पाऊस पडतो. काही तास सतत पाऊस पडल्यास पाणी साचून मुंबई ठप्प होते. मुंबई महापालिकेने २६ जुलै २००५ च्या पूरस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ८ ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम हाती घेतले होते. त्यातील ६ ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले असून अद्यापही माहुल व मोगरा पंपिंग स्टेशनची कामे प्रलंबित आहेत. पालिकेने हिंदमाता परिसरात पावसाळ्यात पाणी साचून होणारी पूरस्थिती दूर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून ब्रिटनिया पंपिंग स्टेशन उभारले. मात्र, तरीही हिंदमाता येथील पूरस्थितीमध्ये फार मोठा फरक पडलेला नाही. त्यामुळे आता हिंदमाता येथे साचणाऱ्या पाण्याचे भूमिगत टाक्या बांधून त्यात साठा करून त्याचा हळूहळू निचरा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी मायक्रोटनेलिंग पद्धतीने एफ/ दक्षिण भागातील डॉ. बी. ए. रोड मार्गावरील लालबाग पोलीस चौकीपासून ते श्रावण यशवंते चौकापर्यंत १८०० मिमी व्यासाच्या आकाराची अतिरिक्त पर्जन्यजलवाहिन्या टाकण्यात आली आहे. मुळात हे कंत्राटकाम १४.५० टक्के जादा दराने मे. मिशिगन इंजिनियर्स या कंत्राटदाराला ३९.८३ कोटीत देण्यात आले. मात्र काही कारणास्तव कामातील बदल व वाढीव कामांमुळे खर्चात तब्बल ३२.७२ कोटी रुपयांची वाढ झाल्याने कंत्राटकामाची किंमत ३९.८३ कोटी रुपयांवरून थेट ७२.५६ कोटींवर गेले आहे.

कंत्राटाच्या किमतीत वाढ -

तसेच, पालिकेच्या जी/ उत्तर भागातील दादर धारावी नाल्याच्या भिंतीच्या पुनर्बांधणीचे कामही पालिकेने मे. ए. पी.आय. सिव्हिलकॉन या कंत्राटदाराला १८ महिन्यांसाठी १९.८९ टक्के कमी दराने ४४.०४ कोटी रुपयांत दिले होते. मात्र काही वाढीव कामांमुळे मूळ कंत्राटकामाच्या किमतीत थेट २७.०७ कोटी रुपयांची वाढ होऊन कामाची किंमत थेट ७१.१२ कोटींवर गेली आहे. आतापर्यंत फक्त ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ७० टक्के काम बाकी आहे. त्यामुळे या दोन्ही कामांचा संबंध हिंदमाता परिसरातील पूरस्थितीशी निगडित असला तरी या दोन्ही कामांची एकूण मुळ कंत्राट किंमत ३९.८३ कोटी अधिक ४४.०४ कोटी अशी मिळून ८३.८८ कोटी रुपये होते. मात्र दोन्ही कामांत वाढीव कामे असल्याने कंत्राट किमतीतही तब्बल ५९.८० कोटींची वाढ होऊन कंत्राट किंमत थेट १४३ कोटी ६८ लाख रुपयांवर गेली आहे.

विरोधकांकडून आक्षेपाची शक्यता -

यासंदर्भातील २ प्रस्ताव स्थायी समिती बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. या कामासाठी जितका खर्च करण्यात येणार होता त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कंत्राटदाराला वाढीव रक्कम मंजूर करण्यासाठी विरोधी पक्षात असलेली भाजप व इतर विरोधी पक्षांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - Mumbai Air Pollution : मुंंबई गुदमरतेय! वायू प्रदुषणात दिल्लीलाही टाकले मागे!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.