ETV Bharat / city

..अन्यथा आंदोलन करू, मुंबई विद्यापीठाविरोधात अभाविप आक्रमक

सध्याच्या काळात परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने होत असून विद्यार्थ्यांकडून प्रमाणापेक्षा जास्त शुल्क आकारण्यात येत आहे. सदर विद्यार्थ्यांची लूट त्वरित थांबण्यात यावी व येत्या 30 एप्रिल 2021 पर्यंत विद्यार्थी हिताचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घ्यावा. तसेच निर्णय न झाल्यास आभाविपच्या तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल, असा तीव्र इशारा देखील अभाविपतर्फे देण्यात आला आहे.

संघटनांनी निवेदन दिले
संघटनांनी निवेदन दिले
author img

By

Published : Apr 18, 2021, 9:34 PM IST

मुंबई - कोरोनाच्या महामारीमुळे महाविद्यालय बंद असताना विद्यार्थ्यांकडून मुंबई विद्यापीठ प्रशासन शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क आकारात आहे. इतकेच नव्हे तर या परीक्षा शुल्कात कोणत्याच प्रकारची सवलत देण्यात आली नाही. त्यामळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठ प्रशासन विरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे येत्या 30 एप्रिल 2021 पर्यत विद्यार्थी हिताचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून देण्यात आलेला आहे.

शैक्षणिक शुल्कात सवलत द्या -

कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व स्तरावर समस्या निर्माण झाल्या आहेत. सगळीकडे अनिश्चिततेचे वातावरण आहे. तसेच पालक वर्ग देखील आर्थिक संकटामध्ये अडकलेला आहे. अशा महामारीच्या काळातही विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये कोणत्याच प्रकारची सवलत देताना दिसत नाही. मात्र, मुंबई विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागासाठी जी शैक्षणिक शुल्क विद्यार्थ्यांना आकारले जात आहे, त्यात 30 टक्के त्वरित सवलत देण्यात यावी, तसेच जी परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारले जात आहे, त्यात 50 टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

आंदोलनाचा इशारा -

सध्याच्या काळात परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने होत असून विद्यार्थ्यांकडून प्रमाणापेक्षा जास्त शुल्क आकारण्यात येत आहे. सदर विद्यार्थ्यांची लूट त्वरित थांबण्यात यावी व येत्या 30 एप्रिल 2021 पर्यंत विद्यार्थी हिताचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घ्यावा. तसेच निर्णय न झाल्यास आभाविपच्या तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल, असा तीव्र इशारा देखील अभाविपतर्फे देण्यात आला आहे. याविषयी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव बळीराम गायकवाड आणि शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. माने यांना अभाविप तर्फे निवेदन देण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.