ETV Bharat / city

'ईटीव्ही भारत' विशेष - कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मुख्यमंत्र्यांनी बोलावली आढावा बैठक - Maharashtra Corona Update

मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात २ ते 3 हजारांवर असलेली रुग्णसंख्या ४ हजारांवर गेली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्र्यांनी आढाव बैठक बोलावली असून, त्यात महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
author img

By

Published : Feb 15, 2021, 10:07 PM IST

मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात २ ते 3 हजारांवर असलेली रुग्णसंख्या ४ हजारांवर गेली आहे. तर मुंबईत ३०० च्या आसपास असलेली रुग्णसंख्या ६०० च्या वर गेली आहे. मुंबईमध्ये लोकल ट्रेनमध्ये वाढलेली गर्दी आंणि नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्ण संख्येत वाढ होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. दरम्यान वाढणाऱ्या रुग्णसंख्येबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आढाव बैठक बोलावली असून त्यात महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार कमी झाला. कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने टप्प्याटप्याने सर्व व्यवहार सुरू झाले. मुंबईमध्ये अकरा महिने लोकल ट्रेनमधील प्रवास सामान्य नागरिकांसाठी बंद होता. १ फेब्रुवारीपासून लोकल ट्रेनमधून सर्व सामान्य नागरिकांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली. त्यानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले आहे.

राज्यात रुग्ण संख्या वाढली

राज्यात दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात ११ डिसेंबरला ४२६८, १२ डिसेंबरला ४२६९, १६ डिसेंबरला ४३०३ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर यात घट होऊन २ ते ३ हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. आता तब्बल दोन महिन्याने पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. काल रविवारी ४०९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २० लाख ६४ हजार २७८ वर पोहोचला आहे. तर आज ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५१ हजार ५२९ वर पोहोचला आहे. राज्यात सध्या १ लाख ७४ हजार २४३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून, ३५ हजार ९६५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १५ नोव्हेंबरला २ हजार ५४४, १८ जानेवारीला १ हजार ९२४ तर २५ जानेवारीला १ हजार ८४२ इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले होते.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबईतही रुग्णांची संख्या वाढली

मुंबईत काल रविवारी ६४५ रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाख १४ हजार ७६ वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा ११ हजार ४१७ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या २ लाख ९६ हजार १९५ वर गेली आहे. मुंबईत सध्या ५६०८ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ४७९ दिवस इतका आहे. मुंबईत ७ नोव्हेंबरला ५७६, १० नोव्हेंबरला ५३५, १६ नोव्हेंबरला ४०९, १८ जानेवारीला ३९५, २४ जानेवारीला ३४८, २६ जानेवारीला ३४२, १ फेब्रुवारीला ३२८ म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

बेशिस्त नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार वाढला

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार होत असला तरी देखील नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. गर्दी करू नका म्हटले तरी गर्दी केली जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला सरकार जबाबदार धरता येणार नाही. नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पोलिसांना लोकलच्या डब्यात तैनात करा

गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे सुद्धा तीन तेरा वाजत आहे. अनेक प्रवासी लोकलमध्ये बसल्यानंतर तोंडावरील मास्क काढून बसतात. त्यामुळे इतरही प्रवाशांना त्रास होतो. सहप्रवाशांनी मास्क लावण्यास सांगितल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडणे सुद्धा होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आणि राज्य सरकारकडून प्रत्येक डब्यात पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून कोरोनाचे आखून दिलेल्या नियमांचे पालन होईल आणि लोकल प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल, असे रेल्वे प्रवाशांनी म्हटले आहे. तर रेल्वे पोलीस, आरपीएफ, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड, महापालिका कर्मचारी यांनी कठोर पावले उचलून कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. फक्त महत्त्वाच्या स्थानकावरच कारवाई न करता प्रत्येक लहान-मोठ्या स्थानकावर कारवाई करणारे पथक उभे करावे, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे नंदकुमार देशमुख यांनी केली आहे.

२१, २२ फेब्रुवारीनंतर लॉकडाऊनचा निर्णय

लोकल सुरू केल्यामुळे रुग्ण संख्या वाढली हे एकमेव कारण आहे, असं म्हणता येणार नाही. हवाई वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. मोजक्या शहरातून किंवा मोजक्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होत्या, पण त्यांची संख्या वाढलेली आहे. प्रवाशांची आपण आरटीपीसीआर चाचणी करत आहोत. डोमेस्टिकमध्ये सुरुवातील ४ राज्यातील चाचण्या करत होतो, आता ५ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या करतोय. लोकल प्रवाशांची संख्या वाढतेय. त्याच सोबत सगळ्यांनी मास्क लावणं, अंतर राखण गरजेचे आहे. सध्या लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात चर्चा नाही. आपण आखून दिलेल्या कार्यक्रमाचं पालन केले तर आजारापासून आपण सुरक्षित राहू शकतो. आपण दर १५ दिवसाच्या कालावधीचा आढावा घेत आहोत. २१ - २२ फेब्रुवारीला पुन्हा रुग्ण संख्येचा आढावा घेऊन नंतर सर्व सामान्यांच्या प्रवासाचा निर्णय होईल. मुंबई महानगरपालिका आणि आजूबाजूच्या महानगर पालिका विचारात घ्याव्या लागतील त्यानंतर त्यासंदर्भातील शिफारस, मुद्दे राज्यशासनाला उपलब्ध करून देऊ, त्यानंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेता येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे.

मंत्रालयात उद्या आढावा बैठक

राज्यात आणि मुंबईत रुग्ण संख्या वाढत आहे. नागरिकांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. यासाठी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे. राज्यातील आरोग्य विभागाचे तसेच मुंबई महापालिका आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत रुग्ण संख्या कमी कारण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.