मुंबई - महाविकास आघाडीचे 'ठाकरे सरकार' सत्तेत आल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मौन बाळगले. मात्र, येत्या 23 जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगाव येथील नेस्को सभागृहात महाअधिवेशन होणार आहे. या महाअधिवेशनात राज ठाकरे हे राज्यातील ठाकरे सरकारविरोधात तोफ डागणार आहेत.
हेही वाचा... कामगारांच्या देशव्यापी संपाला शिवसेनेचा पाठिंबा
बोरिवली येथे प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह सभागृहात व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या 'बिटवीन दी लाईन्स’ या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शी. द. फडणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
हेही वाचा... 'नवीन खाती निर्माण करणार, सोमवारपर्यंत खातेवाटप'
यावेळी राज्याच्या राजकारणाबाबत राज यांना विचारले असता त्यांनी, मला जे बोलायचे ते मी 23 तारखेला बोलेल असे म्हटले. यामुळे राज ठाकरे हे महाअधिवेशनात सरकारविरोधात भुमिका उघड करतील, अशी अपेक्षा आहे. प्रशांत कुलकर्णी यांनी मातोश्री ते वर्षा प्रवास केला. मात्र तेव्हा कोणाशी प्रतारणा केली नसेल, असा टोला देखील राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.
हेही वाचा... शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप, फडणवीस न्यायालयात राहणार हजर?
उद्घाटनानंतर राज ठाकरे यांनी प्रदर्शनातील सर्व व्यंगचित्रांची पाहणी केली. यावेळी राज ठाकरे यांनी भारतात कलेबाबत असलेल्या उदासीनतेबाबत आपली नाराजी व्यक्त केली.