ETV Bharat / city

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात आर्थिक राजधानीत चोरी, रॉबरीच्या गुन्ह्यात वाढ - Lockdown Phase II Crime Rise Mumbai

कोरोना संक्रमणाच्या दुसरा लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना राज्यात लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या असल्याचेही समोर आले आहे.

Robbery Crime Rises Mumbai
रॉबरी गुन्हे वाढ मुंबई
author img

By

Published : Jun 10, 2021, 9:19 PM IST

मुंबई - कोरोना संक्रमणाच्या दुसरा लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना राज्यात लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या असल्याचेही समोर आले आहे. जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या दरम्यान मुंबई शहरात घडलेल्या चोरी, दरोडा, लुटीच्या संदर्भात गुन्ह्यांचा आढावा घेणारी ही विशेष बातमी.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - पीक कर्ज नियमित फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज मिळणार 0 टक्के व्याजाने

जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या 4 महिन्यांच्या काळात मुंबई शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या 94 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वाहन चोरीचे तब्बल 1 हजार 98 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यामध्ये 405 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केलेला आहे. चोरीचे तब्बल 1 हजार 387 गुन्हे नोंदविण्यात आल्यानंतर यामध्ये 495 गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता आलेली असून घरफोडीचे 537 गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात घडले असताना यामध्ये केवळ 237 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केलेला आहे. चेन स्नॅचिंगचे 42 गुन्हे मुंबईत घडले असून यामध्ये 26 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केला असताना रॉबरीचे तब्बल 246 गुन्हे या दरम्यान घडलेले असून 215 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केलेला आहे.

2021 च्या तुलनेत 2020 मध्ये कमी गुन्हे

कोरोना संक्रमणामुळे 2020 मध्ये जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन लावण्यात आलेला होता, त्यावेळेस या वर्षभरामध्ये जानेवारी 2020 ते एप्रिल 2020 या दरम्यान वाहन चोरीचे तब्बल 725 गुन्हे घडले होते. तर, चोरीचे 1 हजार 332 गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या परिसरांमध्ये घडले होते. घर फोडीचे 510 गुन्हे, तर चेन स्नॅचिंगचे 42 व रॉबरीचे 201 गुन्हे मुंबई शहरात घडले होते.

एप्रिल 2021 या महिन्यामध्ये वाहन चोरीचे 198 गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या परिसरांत घडले असताना यामध्ये केवळ 39 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केलेला असून चोरीचे 258 गुन्हे घडल्यानंतर 66 प्रकरणांमध्ये पोलिसांनी तपास करत आरोपींना अटक केली आहे. चेन स्नॅचिंगचे 4 गुन्हे मुंबई शहरात घडले असताना 2 गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला असून रॉबरीचे 42 गुन्हे घडल्यावर 28 प्रकरणांत पोलिसांनी तपास पूर्ण केलेला आहे.

हेही वाचा - नवी मुंबईतील नव्या प्रकल्पाला दि.बा.पाटीलांचे नाव प्रकल्पग्रस्त कृती समितीने सुचवावे - एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.