ETV Bharat / city

मुंबईत आज 5,883 तर आतापर्यंत 68 हजार 837 आरोग्य, फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस

author img

By

Published : Feb 5, 2021, 10:18 PM IST

मुंबईत आज 5883 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण 68 हजार 837 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

mumbai vaccination
mumbai vaccination

मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असून 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत होती. आजपासून फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत आज 5883 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण 68 हजार 837 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

लसीकरणाची आकडेवारी -

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन अॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज 20 लसीकरण केंद्रांवर 108 बूथवर मुंबईत आज 6547 आरोग्य कर्मचारी तर 1752 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 8299 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 5130 आरोग्य कर्मचारी तर 753 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 5833 जणांना लस देण्यात आली. आज 8 जणांना सौम्य दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. मुंबईत आतापर्यंत 68 हजार 837 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

आज 5883 जणांना लसीकरण -

मुंबईत आज परळ येथील केईएम रुग्णालयात 824, सायन येथील टिळक रुग्णालय 233, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 536, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 702, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 19, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 570, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 810, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 603, बांद्रा भाभा हॉस्पिटल 169, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 59, सेव्हन हिल 147, गोरेगाव नेस्को 224, मा हॉस्पिटल 122, कस्तुरबा हॉस्पिटल 103, सेंटेनरी गोवंडी हॉस्पिटल 132, दहिसर जंबो 166, एस के पाटील हॉस्पिटल 187, बीएआरसी 144, एम डब्लू हॉस्पिटल 65, भगवती हॉस्पिटल 68 अशा एकूण 5883 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करला लस देण्यात आली.

आतापर्यंत 68,837 लसीकरण -

16 जानेवारीपासून आतापार्यंत परळ येथील केईएम रुग्णालयात 9013, सायन येथील टिळक रुग्णालय 4405, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 6987, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 8593, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 1322, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 10024, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 10271, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 7273, बांद्रा भाभा हॉस्पिटल 3940, भायखळा येथील राज्य सरकारच्या जे.जे. हॉस्पिटल 554, सेव्हन हिल 2744, गोरेगाव नेस्को 2237, मा हॉस्पिटल 210, कस्तुरबा हॉस्पिटल 162, सेंटेनरी गोवंडी हॉस्पिटल 197, दहिसर जंबो 262, एस के पाटील हॉस्पिटल 233, बीएआरसी 277, एम डब्लू हॉस्पिटल 65, भगवती हॉस्पिटल 68 अशा एकूण 68 हजार 837 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करला लस देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.