ETV Bharat / city

पावसाच्या साचलेल्या पाण्यात अडकून पडल्याने बेस्टच्या ५० बसेस नादुरुस्त

मुंबईमध्ये काल रात्रीपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. साचलेल्या पाण्यात अडकून पडल्याने बेस्टच्या तब्बल ५० बसेस नादुरुस्त झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

author img

By

Published : Jun 9, 2021, 5:07 PM IST

50 buses not working Best Mumbai
मुंबई पाऊस ५० बसेस नादुरुस्त

मुंबई - मुंबईमध्ये काल रात्रीपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. साचलेल्या पाण्यात अडकून पडल्याने बेस्टच्या तब्बल ५० बसेस नादुरुस्त झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - Mumbai Rains ..त्यामुळे काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच, महापालिका आयुक्तांची स्पष्टोक्ती

दिवसभरात ३३४९ बसेस चालवल्या

मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून बेस्टची ओळख आहे. थंडी असो वा पाऊस, कोरोनामुळे ट्रेन बंद पडली तरी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना इच्छित स्थळी पोहचवण्याचे कार्य बेस्टकडून केले जात आहे. आजही मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिकांना आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी बेस्टकडून ३३४९ बसेस चालवण्यात आल्या. त्यापैकी ५० बसेस पावसामुळे साचलेल्या पाण्यामध्ये अडकून नादूरुस्त झाल्या.

५० बसेस नादुरुस्त

मुंबईमध्ये काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. मुंबईत कोरोनाचाही प्रसार आहे, यामुळे मानखुर्द स्टेशन, सायन रोड नंबर २४, अँटॉप हिल सेक्टर ७, गांधी मार्केट, कमानी ते बैलबाजार, शीतल टॉकीज, कल्पना टॉकीज, पिंकी सिनेमा, हिंदमाता, एअर इंडिया कॉलनी, नॅशनल कॉलेज, आर.सी.एफ कॉलनी, अंधेरी मार्केट, अजित ग्लास, खोदादाद सर्कल आदी ठिकाणी पाणी साचले होते. पाणी साचलेल्या ठिकाणी ५० बसेस अडकून पडल्या. या बसेसमध्ये पाणी शिरल्याने त्या नादुरुस्त झाल्याचे बेस्ट प्रशासनाकडून कळवण्यात आले.

हेही वाचा - अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांना सुरूवात; कोरोनामुळे होणार ऑनलाइन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.