ETV Bharat / city

मुंबईत आता जिनोम सिक्वेन्सिंग लॅब; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ - जिनोम सिक्वेन्सिंग लॅब शुभारंभ मुंख्यमंत्री ठाकरे

लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरील महागडी उपचाराची सुविधा नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. योग्य उपचार मिळणार असल्याने रुग्णांना नवजीवन मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

Genome Sequencing Lab inauguration cm Thackeray
जिनोम सिक्वेन्सिंग लॅब नायर रुग्णालय
author img

By

Published : Aug 4, 2021, 5:44 PM IST

मुंबई - लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरील महागडी उपचाराची सुविधा नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. योग्य उपचार मिळणार असल्याने रुग्णांना नवजीवन मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. तसेच, मुंबईत जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरू केल्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ प्राप्त झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Genome Sequencing Lab inauguration cm Thackeray
ऑनलाईन बैठक

हेही वाचा - MPSC : पुढे ढकलण्यात आलेली संयुक्त पूर्वपरीक्षा आता ४ सप्टेंबरला होणार

जिनोम सिक्वेन्सिंग लॅबचे शुभारंभ

टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर रुग्णालयाच्या शतकोत्तर महोत्सव आणि जिनोम सिक्वेन्सिंग लॅब आणि स्पिनराझा औषधोपचार प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव, उप महापौर ॲड. सुहास वाडकर, महापालिकेचे विरोधी पक्षनेता रवी राजा, महापालिका आयुक्त आय.एस. चहल, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, बालरोग तज्ज्ञांच्या टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.

'रेज अगेंस्ट दी डाईंग ऑफ लाईट' या पुस्तकाचे प्रकाशन

दरम्यान, अनेकांना दीर्घायुष्य देणाऱ्या शतायुषी नायर रुग्णालयाच्या सेवेला प्रणाम करून सर्व डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन करीत शतकोत्तर वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 'रेज अगेंस्ट दी डाईंग ऑफ लाईट' या डॉ. शिशिर श्रीवास्तव लिखित पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

पुस्तकाचे प्रकाशन करताना

एसएमए वरील औषध भारतात उपलब्ध करण्याची गरज

स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीसारख्या (एसएमए) दुर्धर आजारापासून लहान मुलांना वाचवण्याची गरज आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च हा कोट्यावधीमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी वेदिका शिंदे या बालिकेचे याच आजाराने निधन झाले. तिला १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आले होते, मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत. भविष्यात या आजाराने लहान मुले दगावू नयेत, म्हणून महापलिकेचे डॉक्टर्स अविरत प्रयत्न करत आहेत. त्यावरील औषध भारतात उपलब्ध करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

नायर रुग्णालयात ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’वर उपचाराची सुविधा

आजपासून नायर रुग्णालयात ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरावर उपचाराची सुविधा निर्माण झाली आहे. अमेरिकास्थित संस्थेच्या माध्यमातून या आजारावर प्रभावी असणारे महागडे इंजेक्शन रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार असून, सध्या नायर रुग्णालयातील १७ रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाविरुद्धची लढाई गेल्या दीड वर्षांपासून सुरू असून त्यात डॉक्टर्स, कर्मचारी खंबीरपणे लढत आहेत. या परिश्रमामुळे लाखो नारिकांना जीवनदान देण्याचे काम झाले आहे. मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे जगात मुंबई मॉडेलचे कौतुक झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाचा विषाणू नवीन अवतार घेत असतो. विषाणूने बदललेला अवतार शोधून त्यावर वेळीच उपचार शोधण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग लॅब उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे, मुंबईमध्ये अशी लॅब असणे गरजेचे होते. आजपासून ही लॅब कार्यरत होईल, त्यामुळे कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ प्राप्त होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाची वाढ जिथे जिथे होते तिथल्या विषाणूला शोधून काढणे, त्याचे जनुकीय परिणाम शोधणे गरजेचे असते. नसता अनर्थ घडतो. जेवढा विषाणूचा प्रकार ओळखण्यास उशीर, तितके त्याचे परिणाम समजून घेणेही कठीण असते, हे कोरोना विषाणूवरून आपणास दिसून आले आहे. मुंबईमध्ये सुरू झालेली जिनोम सिक्वेन्सिंग लॅब स्थापन करण्याची इच्छा महापालिकेने पूर्ण करून दाखवली. त्यासाठी शासन आणि महापालिकेवर आर्थिक भार न टाकता त्यांनी सीएसआर निधीतून हे काम केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्ष राजुल पटेल, डॉ. शशांक जोशी, डॉ. संजय ओक, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आपली मते मांडली.

स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, राखी जाधव, शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष राजराजेश्वरी अनिल रेडकर सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्यासह संबंधित मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

काय आहे जिनोम सिक्वेन्सिंग लॅब?

नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेन्सिंग ही पद्धती वापरून विषाणूंचे जनुकीय सूत्र ओळखता येते. त्यामुळे, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. तसेच, उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. जिनोम सिक्वेन्सिंग वैद्यकीय प्रयोगशाळा (लॅब) मध्ये एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय नमुन्यांची चाचणी करता येणे शक्य होते. सध्याच्या कोविड - १९ विषाणू संसर्ग कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करून उपचारांना वेग देणे शक्य होणार आहे.

पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग संयंत्र उपलब्ध करून दिले आहे. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे २ जिनोम सिक्वेन्सिंग संयंत्र मुंबई महापालिकेला दान स्वरुपात दिले आहेत. त्यासोबत ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन यांनी देखील सुमारे ४ कोटी रुपयांची मदत या संयंत्रांसाठी आणि त्याद्वारे होणाऱ्या चाचण्यांसाठी केली आहे. जिनोम सिक्वेन्सिंग संयंत्राद्वारे एकाचवेळी ३८४ नमुन्यांची तपासणी होऊन ४ दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.

स्पिनराझा औषधोपचार

स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी (एस. एम. ए.) हा लहान मुलांमध्ये आढळणारा दुर्मिळ आजार असून त्यातून मुलांचे स्नायू विकसित होत नाहीत. या आजाराने ग्रस्त संबंधित मुलांना आयुष्यभर विकलांग जीवन जगावे लागू शकते किंवा त्यांचा मृत्यू देखील ओढवू शकतो. या आजारावर औषधोपचार अत्यंत महागडे आहेत. ही बाब लक्षात घेता, अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित डायरेक्ट रिलिफ, या बिगर शासकीय संस्थेने महापालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच, या आजाराने ग्रस्त १७ रुग्णांची निवड आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने केली आहे. या १७ रुग्णांना स्पिनराझा हे औषध देण्यासाठी डायरेक्ट रिलिफ ही संस्था सर्व आर्थिक भार उचलणार आहे. स्पिनराझा औषधाच्या एका डोसची किंमत सुमारे ८७ लाख रुपये इतकी असून पहिल्या वर्षी सुमारे ६ कोटी तर, त्यापुढील प्रत्येक वर्षी ३ कोटी २० लाख रुपये इतका खर्च संपूर्ण आयुष्यभर एका रुग्णाला करावा लागतो.

हेही वाचा - BYJU'S ॲपचे सर्वेसर्वा रवींद्रन यांच्याविरोधात गुन्हा; UPSC अभ्यासक्रमात चूकीची माहिती प्रसिद्ध केल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.