ETV Bharat / city

राज्यात १९५२ सरकारी-खासगी डॉक्टरांना कोरोनाची लागण, तर 17 डॉक्टरांचा मृत्यू - डॉक्टरांना कॊरोनाची लागण,

महाराष्ट्रात कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाबाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. 21 ऑगस्टपर्यंत राज्यात 1952 सरकारी-खासगी डॉक्टरांना कॊरोनाची लागण झाली आहे. तर यात 17 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ .प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी यांनी 'ईटिव्ही भारत'ला दिली आहे.

Corona infection to doctors,
डॉक्टरांना कॊरोनाची लागण,
author img

By

Published : Aug 22, 2020, 2:54 PM IST

Updated : Aug 22, 2020, 5:57 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच कॊरोना योध्येही मोठ्या संख्येने कॊरोनाचे शिकार होताना दिसत आहेत. त्यानुसार 21 ऑगस्टपर्यंत राज्यात 1952 सरकारी-खासगी डॉक्टरांना कॊरोनाची लागण झाली आहे. तर यात 17 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

कोरोना योद्धेच मृत्युमुखी पडत असल्याने ही गंभीर बाब मानली जात असून आता डॉक्टरांना आणखी चांगल्या सुविधा पुरवण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे. मार्चपासून मुंबईसह राज्यभर सरकारी-पालिका रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत. पीपीई किट, एन-95 मास्कसह इतर सुविधा त्यांना पुरवल्या जात आहेत. मात्र तरीही राज्यात मोठ्या संख्येने डॉक्टरांना कॊरोनाचा संसर्ग होत आहे. तर यात डॉक्टरांचा मृत्यू ही होत आहे. याअनुषंगाने राज्याची ताजी आकडेवारी डॉ. आवटे यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली असून ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.

मार्चपासून 21 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात 1952 डॉक्टर कॊरोनाग्रस्त होत आहेत. त्यातही महत्वाची बाब म्हणजे यात सरकारी-पालिका आणि खासगी अशा सर्वच डॉक्टरांचा समावेश आहे. या कॊरोनाग्रस्त डॉक्टरांपैकी 17 डॉक्टरांची कोरोनाविरोधातील झुंज अपयशी ठरली आहे. डॉक्टरांनाही मोठ्या संख्येने लागण होत असून त्यांचा मृत्यू होत आहे ही गंभीर बाब मानली जात आहे. राज्यात 35 जिल्हे आणि 27 महापालिका क्षेत्र आहेत. तेव्हा या सर्व क्षेत्रात सरकारी-पालिका-खासगी डॉक्टर काम करत आहेत. कॊरोना हे युद्ध मानले तर डॉक्टर हे सैनिक आहेत. ते थेट रुग्णांच्या संपर्कात येतात. तेव्हा त्यांना लागण होण्याची शक्यता जास्त असते. त्यानुसार राज्यातही डॉक्टर कॊरोनाग्रस्त होत आहेत. पण डॉक्टरांना कॊरोनाची लागण होऊ नये वा त्यांचा मृत्यू होऊ नये यासाठी सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे डॉ. आवटे यांनी सांगितले आहे. दरम्यान मृत्यू झालेले डॉक्टर हे मुंबई, पुणे, अकोला, कोल्हापूर आणि नाशिकमधील आहेत.

आयएमच्या डॉक्टरांचा मृत्यूचा आकडा 264 वर

एकीकडे राज्यात डॉक्टर कॊरोनाग्रस्त होत असताना देशभरही डॉक्टरांना मोठ्या संख्येने कॊरोनाचा संसर्ग होत असल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नेही शुक्रवारी एक आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार देशभरात आयएमएच्या 264 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, आयएमएने ईटीव्ही भारतशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयएमएच्या 1700 शाखा असून या सर्व शाखातील मिळून 264 आयएमए डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर 21 ऑगस्टपर्यंत 1953 डॉक्टर कॊरोनाग्रस्त झाले आहेत. यातील 890 डॉक्टर स्वतंत्र प्रॅक्टीस करणारे, 767 डॉक्टर निवासी तर 296 डॉक्टर हाउस सर्जन आहेत. या पार्श्वभूमीवर आयएमएने यावर चिंता व्यक्त करत डॉक्टरांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत.

Last Updated : Aug 22, 2020, 5:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.