पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्म स्थान असलेल्या शिवनेरी गडावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या उपस्थितीत जन्मसोहळा आयोजित केला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी निवडक नागरिक व शिवभक्तांना गडावर प्रवेश दिला जात आहे. शिवजन्म सोहळ्याला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. आज सकाळी साडेसात वाजता गडावरील शिवाई मंदिरात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली. शिवजन्म सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराजांना वंदन करत 'महाराष्ट्राच्या घराघरात अन् मनामनात, शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे...', अशी भावना व्यक्त केली आहे.
सविस्तर वृत्त - किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शिवाई देवी मंदिरात शासकीय पूजा संपन्न
मुंबई - आज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती आहे. राज्यात प्रतिवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा मात्र कोरोना महामारीच्या सावटाखाली काही निर्बंध आणि नियमांचे पालन करत शिवजयंती साजरी करावी लागणार आहे. राज्य शासनाकडून शिवजयंती साजरी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध लागू केले आहेत. त्या निर्णयावर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी स्वागतही केले आहे.
सविस्तर वृत्त - छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती; मुख्यमंत्री ठाकरे आज शिवनेरीवर
केप कार्निव्हल (फ्लोरिडा) - अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाचा (NASA) 'पर्सिव्हरन्स' हा रोव्हर मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरला. मंगळ ग्रहावरील नागंरी रंगाच्या आकाशाला कवेत घेत उपग्रहाने अवघड असे लँडीग केले. हा रोव्हर आता मंगळ ग्रहावर प्राचिन जीवसृष्टीचा धांडोळा घेणार आहे. मंगळावरील दगड मातीचे नमुने हा रोव्हर पृथ्वीवर घेवून येणार आहे. पूर्वी या ग्रहावर जीवसृष्टी होती का? या प्रश्वाची उकल होण्यास मदत होणार आहे.
सविस्तर वृत्त - मंगळावर नासाच्या रोव्हरची यशस्वी 'लँडिंग'; प्राचिन जीवसृष्टीचा घेणारा मागोवा
मुंबई - राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातली माहिती त्यांनी ट्विट करून दिली. तसेच संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सविस्तर वृत्त - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती
नवी दिल्ली - काश्मिरातील बडगाम जिल्ह्यात पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात एक विशेष पोलीस पथकातील अधिकारी शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे. सेंट्रल काश्मीरमधील बिरवाह झिंनगाम परिसरात ही चकमक झाली.
सविस्तर वृत्त - काश्मिरातील बडगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक, पोलीस अधिकारी शहीद
मुंबई - कोरोनाबाधितांची संख्या गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने कमी होत असल्याने दिलासादायक स्थिती होती. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण राज्यात वाढू लागले आहे. मुंबई, पुणे ठाण्यासह नागपूर, अमरावतीमध्ये बुधवारी रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली. विदर्भातील ११ पैकी पाच जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने शाळा-महाविद्यालये बंद केली असून चार जिल्ह्यांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सविस्तर वृत्त - महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढता; विदर्भामध्ये स्थिती चिंताजनक
मुंबई - आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, लोकल ट्रेन आणि इतर गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 14 फेब्रुवारीला 4092, 15 फेब्रुवारीला 3365, 16 फेब्रुवारीला 3663, 17 फेब्रुवारीला 4787 रुग्ण आढळून आले होते. आज 5427 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसात रुग्णांच्या आणि मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
सविस्तर वृत्त - चिंताजनक! कोरोनाची रुग्णसंख्या वाढली, गुरुवारी 5427 नवीन रुग्ण, 38 मृत्यू
नवी दिल्ली - सोन्याच्या किमतीत दिल्लीत आज प्रति तोळा (१० ग्रॅम) ३२० रुपयांनी घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रति तोळा ४५,८६७ रुपये आहेत. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,१८७ रुपये आहे.
सविस्तर वृत्त - सोन्याच्या दरात प्रति तोळा ३२० रुपयांनी घसरण
मुंबई - प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते, असे बडेबुजुर्ग सांगतात. परंतु आपल्यावर इंग्रजांनी दीड-दोनशे वर्ष राज्य केल्यामुळे गोरी कातडी म्हणजेच सुंदरता हे मनावर बिंबवले गेले आहे. म्हणूनच बाजारात त्वचा गोरी करण्याऱ्या सौंदर्य प्रसाधनांना जोरदार मागणी आहे. नुकतीच मिस इंडिया 2020 मध्ये उपविजेती ठरलेली मान्या सिंगला तिच्या सावळेपणावरून टोमणे खावे लागायचे. ‘तू काळी आहेस’ म्हणून तिला हिणवले जायचे, खासकरून जेव्हा तिच्या आजूबाजूच्यांना कळले की ती ‘मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेतेय. ‘मिस इंडिया किंवा मिस वर्ल्ड सारखा प्लॅटफॉर्म त्वचेच्या रंगावरून ‘ब्युटी’ ठरवत नसतो याची मला कल्पना होती. तसे असते तर प्रियांका चोप्रा मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड होऊच शकली नसती. आणि या गोष्टीची मी खूणगाठ बांधून ठेवली होती त्यामुळे इतरांकडून कितीही कुचाळक्या केल्या गेल्या तरी मी माझं स्वप्न साकारण्यासाठी मेहनत घेतंच राहिले’, मान्या सिंगने सांगितले.
सविस्तर वृत्त - ‘रंग माझा सावळा’ : व्हीएलसीसी मिस इंडिया २०२०, उपविजेती, मान्या सिंग!
चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तयारीला सर्व संघांनी सुरूवात केली आहे. आज या हंगामासाठी मिनी लिलाव पार पडला. यामध्ये १६४ भारतीय, तर १२५ विदेशी खेळाडूंसह तीन असोसिएट खेळाडूंवर बोली लागली. यंदाच्या या लिलावात दरवर्षीप्रमाणेच परदेशी खेळाडूंना मोठा भाव मिळाला. तसेच काही भारतीय खेळाडूंवर देखील मोठी बोली लागली. वाचा आजच्या लिलावातील सर्वाधिक बोली लागलेले टॉप-१० खेळाडू कोण आहेत...
सविस्तर वृत्त - IPL Auction २०२१ : आयपीएलच्या लिलावात 'हे' १० खेळाडू ठरले महागडे