मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली. यावेळी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहलही त्यांच्यासह उपस्थित होते. उच्च न्यायालयातील लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशांची भेट घेतल्याचे समजते आहे.
हायकोर्टातील लसीकरणाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा!
गेल्या तीन दिवसांपासून हायकोर्टात लसीकरण मोहीम सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने केले जात आहे. याचा आढावा घेण्यासाठीच मुख्यमंत्री हायकोर्टात पोहोचल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही बैठक पूर्वनियोजित असल्याचेही समजते आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांना बेड, औषधे, व्हेंटिलेटर मिळत नसल्याप्रकरणी हायकोर्टात सुमोटो याचिका दाखल आहेत. त्यामुळे या भेटीत काय चर्चा झाली याची उत्सुकता लागून राहिली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..