मुंबई अभिनेता अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याच्या 2020 प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता कमाल आर खानला Actor Kamal R Khan वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने Bandra court आज जामीन मंजूर केला आहे. 6 सप्टेंबर मंगळवारी अजून एका न्यायालयाने 2021 च्या विनयभंगाच्या प्रकरणात त्याला जामीन मंजूर केला होता. दोन्ही प्रकरणात मिळालेल्या जामिनामुळे कमाल खानला दिलासा मिळाला आहे.
मुंबई पोलिसांचा दावा सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कमाल खानला त्याच्या वादग्रस्त ट्विट संदर्भात पोलिसांनी गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावरून अटक केली होती. गुरुवारी 8 सप्टेंबरला सकाळी तो तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. न्यायालयात मुंबई पोलिसांनी Mumbai Police दावा केला आहे, की खानच्या पोस्ट सांप्रदायिक होत्या आणि त्याने बॉलिवूडमधील व्यक्तींना लक्ष्य केले. कमाल खानच्या वतीने जामीनासाठी वकील अशोक सरोगी आणि जय यादव यांच्यामार्फत युक्तिवाद करण्यात आला. कमाल खानच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात कमाल खानने केलेल्या टिप्पण्या चित्रपटावरील आहेत आणि त्याचा वैयक्तिक कोणाशी उद्देशून केल्या नाहीत.
जामीन मंजूर तसेच पोलिसांनी आरोप केल्यानुसार कोणताही गुन्हा नाही, असे कोर्टात सांगण्यात आले आहे. कमाल खान चित्रपट उद्योगात समीक्षक किंवा रिपोर्टर म्हणून काम करत आहे, असा दावा वकिलांनी कोर्टात केला आहे. कमाल खान विरुद्ध 2020 मध्ये भारतीय दंड संहिता कलम 153 दंगल घडवण्याच्या हेतूने उत्तेजितपणे चिथावणी देणे आणि 500 बदनामीची शिक्षा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींसह गुन्हा नोंदवण्यात आला होता. यापूर्वी वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात वांद्रे येथील न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. त्यामुळे कमाल खानचा तुरुंगाबाहेर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.