मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ( शुक्रवारी ) ओबीसी आरक्षणासह नव्याने लॉटरी काढण्यात आली. यामध्ये मुंबईमधील दिग्गज माजी नगरसेवकाना फटका बसला आहे. यामुळे काहीना निवडणूक लढवण्यापासून वंचित राहावे लागले आहे. तर काहीना बाजूचे वॉर्ड शोधावे लागणार आहे. मुंबई महानगर ( Mumbai Municipal Elections 2022 ) पालिकेच्या २३६ प्रभागापैकी अनुसूचित जातीच्या १५ आणि अनुसूचित जमातीच्या २ प्रभागांचे आरक्षण तसेच ठेवून ओबीसी समाजासाठी आरक्षण ( OBC Political Reservation ) काढण्यात आले. त्यासाठी महिला आरक्षण रद्द करून नव्याने आरक्षण लॉटरी काढण्यात आली. यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. एखाद्या प्रभागात आपल्याला पुन्हा मतदार निवडून देतील याची काहीना खात्री होती. मात्र त्यांचे वॉर्ड आरक्षित झाल्याने निवडणूक लढविण्याच्या अपेक्षेवर पाणी सोडावे लागले आहे.
दिग्गजांना फटका : मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा २१७ क्रमांकाचा प्रभाग महिला आरक्षित झाला आहे. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा ९६ क्रमांकाचा वॉर्ड महिला आरक्षित झाला आहे. माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांचा १८५ क्रमांकाचा वॉर्ड ओबीसी महिला झाला आहे. काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांचा वॉर्ड क्रमांक १०४ सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे यामुळे या माजी नगरसेवकाना बाजूच्या वार्डमधून निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी गटनेत्या राखी जाधव यांचा १३० हा वॉर्ड ओबीसी महिला राखीव झाला आहे. त्यांच्या बाजूचा वॉर्ड १२९ हा वॉर्ड सुद्धा ओबीसी झाला आहे. यामुळे राखी जाधव यांना दुसऱ्या वॉर्ड शोधावा लागणार आहे.
एकूण प्रभाग - २३६
अनुसूचित जाती - १५ (८ महिला)
अनुसूचित जमाती - २ (१ महिला)
ओबीसी - ६३ (३२ महिला)
सर्वसाधारण महिला - ७७
खुला वर्ग - ७८
हेही वाचा - NMMC Election 2022: नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022; सर्वसाधारण महिला आरक्षण अपडेट