मुंबई - गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेला मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाला lalabaghcha raja तब्बल २४ तासांच्या मिरवणुकीनंतर भावपूर्ण निरोप देण्यात आले. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राजाचे समुद्रात विसर्जन Immersion of Ganesha of Lalbagh करण्यात आले. सामूहिक आरतीनंतर निरोप घेतो देवा आता. आज्ञा असावी चुकले असेल काही तर माफी असावी असे, म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला. यावेळी गिरगाव चौपाटीवर मोठा जनसागर Janasagar at Girgaon Chowpatty उसळला होता.
रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी - कोरोनामुळे मागील दोन वर्षात लुप्त झालेला उत्साह यंदा अनंत चतुर्थीच्या निमित्ताने पुन्हा दिसून आला. गेले दहा दिवस आनंदाचे लेणे घरोघरी घेऊन आलेल्या गणराया आपल्या गावाला निघाल्याने हजारो भक्तांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. फुलं, गुलालाची उधळण, ढोल, ताशा, बँडच्या तालावर निघालेल्या विसर्जन मिरवणूकांमध्ये हजारो भाविक थिरकले. गुलालाची उधळण झाल्याने मुंबई लालेलाल झाली. या मिरवणुकीत बच्चे कंपनी, तरुण, तरुणी, महिला, पुरुष बेधुंद होवून नाचत होते. मुंबई शहर व उपनगरांमध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. सर्व रस्ते भाविकांनी फुलून केले होते.
शुक्रवारी सकाळी ९ वाजलेपासून विसर्जन स्थळांवर गणेशमूर्तींसह गौरींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. ही शान कुणाची...लालबागच्या राजाची...असं म्हणत लालबागच्या राजाची शाही मिरवणूक Royal Procession of Lord Ganesha of Lalbagh निघाली. ही मिरवणूक शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मार्गस्थ झाली होती. जवळपास 24 तास ही मिरवणूक चालू होती. शेकडो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले आपण पाहू शकतो. कित्येक तास राजाच्या मागे उभे राहून आणि शेकडो भक्तांचा जनसागर घेऊन ही मिरवणूक हळू-हळू पुढे सरकली. लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवर उत्तर आरती करण्यात आली. कोळी बांधवांनी बोटींवरून सलामीही दिली. त्यानंतर विशेष तराफ्यावरून लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात कोळी बांधवांनी विसर्जन केले. बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी गिरगाव चौपाटी फुलून गेली होती. बाप्पाची एक झळक कॅमेरात टिपण्याची उत्सुकता गणेश भक्तांमध्ये ओसंडून वाहत होती.