मुंबई मुंबईत आज दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे (Ganesha For one And Half Days) विसर्जन (Immersion Ganesha Idols) केले जात आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०३४ गणेश मूर्तींचे विसर्जन (Immersion 6034 Ganesha Idols) करण्यात आल्याची माहिती आहे. घरगुती २१२० मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन (Immersion artificial lake) करण्यात आले. विसर्जनाच्या दरम्यान चोख पोलीस बंदोबस्तामुळे (Due to good police presence) कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने (BMC Emergency Management) दिली आहे.
असे झाले विसर्जन मुंबईत कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. आज दीड दिवसांच्या ५,९७२ गणेशमूर्तीं व ६२ हरतालिका अशा एकूण ६०३४ मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. नैसर्गिक विसर्जन स्थळी २० सार्वजनिक गणेशमूर्तींचे, ३८६० घरगुती मूर्तींचे तर ३४ हरतालिकांचेही विसर्जन करण्यात आले. त्याचप्रमाणे कृत्रिम तलावात १६ सार्वजनिक गणेश मूर्तींचे, २०९२ घरगुती मूर्तींचे तर २८ हरतालिकांचे अशा एकूण २१२० मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.
अशी आहे गणेश विसर्जनाची व्यवस्था (Arrangements for Ganesh immersion) श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. प्रमुख विसर्जन स्थळी ७८६ जीव रक्षक तैनात केले आहेत. नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे ४५ मोटार बोट व ३९ जर्मन तराफा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. विसर्जन स्थळी २११ स्वागत कक्ष. चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी ३ हजार ०६९ फ्लड लाईट व ७१ सर्च लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह सुसज्ज असणारे १८८ प्रथमोपचार केंद्र व ८३ रुग्णवाहिका असणार आहेत. निर्माल्यापासून खत बनविण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे ३५७ निर्माल्य कलश व २८७ निर्माल्य वाहने, ४८ निरिक्षण मनोरे, विसर्जन स्थळी १३४ तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था, वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत, यासाठी ४६० पौलादी प्लेटची व्यवस्था, १५२ ठिकाणी कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था, सुमारे १० हजार अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. श्री गणेश मूर्ती विसर्जन ऑनलाईन (Ganesha idol immersion online registration) नोंदणी सुविधा ही https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे.