मुंबई- भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये 8 जुलैसाठी रेड अलर्ट म्हणजेच अति मुसळधार ( Mumbai Red Alert ) पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील शुक्रवारपासून मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर ( Thane Red Alert ) वाढत आहे. त्यात हा पाऊस विश्रांती घेत बरसत असल्याने तेवढाच मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. राज्यात पुढचे 4,5 दिवस मुसळधार-अति मुसळधार पाऊस शक्यता Eआहे. कोकण,मध्य महाराष्ट्र काही भागात अतिवृष्टी शक्यता पहिले 2,3 दिवस. मराठवाडा मध्यम ते जोरदार, विदर्भात ही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
येत्या ४, ५ दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहण्याची ( Monsoon prediction in Maharashtra ) शक्यता आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ( Heavy rain Maharashtra ) आहे. विदर्भ, मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई, ठाणे, पुण्यात गुरुवारी पाऊस आला. पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचले आहे. नागरिकांना पाण्यातून वाट शोधणे कठीण झाले.
या जिल्ह्यांना रेड अलर्ट - रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी 9 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा 8 जुलैपर्यंत रेड अलर्टवर. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला 10 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता - 5 ते 8 तारखेला कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, 5 ते 8 जुलै 2022 दरम्यान दक्षिण गुजरात प्रदेशात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 आणि 8 रोजी पश्चिम मध्य प्रदेश, 5, 8 आणि 9 रोजी विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागांत अती मुसळधार पावसाचे इशारे देण्यात आले आहे.
-
7 July: सक्रिय मान्सून राज्यात ...
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
राज्यात पुढचे 4,5 दिवस मुसळधार-अति मुसळधार पाऊस शक्यता.
कोकण,मध्य महाराष्ट्र काही भागात अतिवृष्टी शक्यता पहिले 2,3 दिवस.
मराठवाडा मध्यम ते जोरदार, विदर्भात हि
- IMD
Watch for IMD Updates please daily. pic.twitter.com/vs2qb2pSuT
">7 July: सक्रिय मान्सून राज्यात ...
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 7, 2022
राज्यात पुढचे 4,5 दिवस मुसळधार-अति मुसळधार पाऊस शक्यता.
कोकण,मध्य महाराष्ट्र काही भागात अतिवृष्टी शक्यता पहिले 2,3 दिवस.
मराठवाडा मध्यम ते जोरदार, विदर्भात हि
- IMD
Watch for IMD Updates please daily. pic.twitter.com/vs2qb2pSuT7 July: सक्रिय मान्सून राज्यात ...
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 7, 2022
राज्यात पुढचे 4,5 दिवस मुसळधार-अति मुसळधार पाऊस शक्यता.
कोकण,मध्य महाराष्ट्र काही भागात अतिवृष्टी शक्यता पहिले 2,3 दिवस.
मराठवाडा मध्यम ते जोरदार, विदर्भात हि
- IMD
Watch for IMD Updates please daily. pic.twitter.com/vs2qb2pSuT
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ काय सांगतात ? भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3-4 दिवसांत मान्सूनच्या अनुकूल परिस्थितीमुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात चांगला पाऊस झाला आहे. पुढील ४-५ दिवस अशीच स्थिती राहणार आहे. त्यात काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकण विभागाला रेड अलर्ट तर मुंबई आणि उपनगराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत दक्षिण मुंबईत 82 मिमी पाऊस झाला, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात 109 मिमी आणि 106 मिमी पाऊस झाला. तर गुरुवारी सकाळी 10 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत पालघरमध्ये सरासरी 89.27 मिमी पाऊस झाला असून वाडा तालुक्यात सर्वाधिक 135 मिमी पाऊस झाला आहे.
दरम्यान, राज्याच्या अनेक भागात ४ जुलैपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागांतून नद्या धोक्याच्या पातळी जवळून वाहत असून काही ठिकाणी सखल भागात पूर स्थिती निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात गुरुवारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही अधून मधून मुंबईत सुरूच आहे. पुढील तीन ते चार दिवस देखील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी येथे पुढील 2 दिवस रेड अर्लटचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबर मुंबईला देखील उद्या सकाळपर्यंत रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार- रत्नागिरी जिल्ह्यात बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर समुद्र देखील खवळला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात एकूण ८०८.५०, तर सरासरी ८९.८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा - कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, 21 ते 24 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज, 70 ते 120 मिमी पावसाची शक्यता, पाऊस वाढल्याने नद्यांची पातळीही वाढणार, डोंगराळ भागात भू:स्खलन होण्याची भिती वाढली आहे.
सातारा जिल्ह्यात 24 तासात सरासरी 19.8 मिलीमीटर पाऊस- जिल्ह्यात बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण सरासरी 19.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर आतापर्यंत सरासरी 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत (24 तासात) झालेल्या चोविस तासात सातारा - 23.3 (91.7), जावळी - 47 (154.8), पाटण - 35 (157.5), कराड -14 (75.0), कोरेगाव - 9.7 (84.7), खटाव - 7.8 (46), माण - 3.6 (118.3), फलटण - 0.7 (65.4), खंडाळा - 2.7 (45), वाई - 18.3 (120.4), महाबळेश्वर - 85.6 (636.3) पावसाची नोंद झाली आहे.
नाशिकमध्येही पावसाची हजेरी- शहरात मध्यरात्री पासून संततधार पाऊस सुरू असून, सकाळनंतर रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. त्याचबरोबर इगतपुरी तालुक्यात पावसाच्या संततधार पावसाला सुरूवात झाला आहे. सर्व राज्यात समाधानकारक पाऊस पडत असला तरीही, शुक्रवारी शहरात पाणी कपात करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 28 टक्के पाऊस पडला आहे. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 33 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. नाशिक जिल्ह्यात 24 धरणात एकूण 29 टक्के पाणीसाठा आहे. तर 7 धरणांत 10 टक्के पेक्षा कमी पाणी उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.