ETV Bharat / city

आयुर्वेदिक शस्त्रक्रियांविरोधात 'आयएमए' आक्रमक! देशभरातील डॉक्टर आज संपावर..

author img

By

Published : Dec 11, 2020, 8:45 AM IST

Updated : Dec 11, 2020, 1:53 PM IST

IMA doctors on strike today demanding halt on ayurvedic surgeries see LIVE Updates
आयुर्वेदिक शस्त्रक्रियांविरोधात 'आयएमए' आक्रमक! देशभरातील डॉक्टर आज संपावर..

13:49 December 11

आसाममधील डॉक्टरांचाही संपाला पाठिंबा; नवा नियम म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ..

IMA doctors on strike today demanding halt on ayurvedic surgeries see LIVE Updates
आसाममधील डॉक्टरांचाही संपाला पाठिंबा; नवा नियम म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ..

एका अ‌ॅलोपॅथी डॉक्टरला शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे आठ ते दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असते. मात्र, केंद्र सरकार आयुर्वेदिक डॉक्टरांना केवळ तीन वर्षांच्या प्रशिक्षणावार शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देत आहे. हा रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचे म्हणत आसामच्या आयएमए अध्यक्षांनी आपला रोष व्यक्त केला.

12:45 December 11

हैदराबामधील डॉक्टर संपावर; मागण्यांसाठी आंदोलन..

हैदराबादमधील आयएमए सदस्य, आणि निलोफर रुग्णालयातील ज्युनियर डॉक्टर्स आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. आयएमएने आयुर्वेदिक शस्त्रक्रियांविरोधात आज संप पुकारला आहे. त्याला देशभरातील डॉक्टरांच्या संघटना आपला पाठिंबा दर्शवत आहेत.

12:43 December 11

दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांचा आयएमएला पाठिंबा..

दिल्लीतील एम्स आणि एलएनजेपी या रुग्णालयांसह अन्य काही सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांनी आयएमएच्या संपाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, हे डॉक्टर संपावर जाणार नसून, कामाच्या वेळी हाताला काळ्या फिती बांधून आयएमएला आपला पाठिंबा दर्शवणार आहेत.

12:16 December 11

पंजाबमधील डॉक्टर संपावर..

पंजाबच्या अमृतसरमधील डॉक्टरांनीही आयएमएच्या संपाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देणारा कायदा मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे, त्यासाठी आम्ही संपावर आहोत. त्यामुळे, आज केवळ गंभीर आणि कोरोना रुग्णांवरच उपचार सुरू असणार आहेत, असे एका डॉक्टरांनी सांगितले.

11:55 December 11

आयएमएच्या समर्थनार्थ गुजरातमधील डॉक्टरांचे आंदोलन..

आयएमएने आज पुकारलेल्या संपाला अहमदाबाद मेडिकल असोसिएशननेही पाठिंबा दर्शवला आहे. या समर्थनार्थ एएमएच्या डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले आहे. 

10:18 December 11

आयएमएच्या संपाविरोधात आयुषही पुढे..

आयुष डॉक्टरांनी आयएमए डॉक्टरांना जशाच तसे उत्तर देत आज आपले दवाखाने, क्लिनिक सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात आज सुमारे सव्वा दोन लाख आयुष डॉक्टर अधिक वेळ रुग्णसेवा देतील, अशी माहिती 'निमा'च्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) डॉ. संजय लोंढे यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली.

08:38 December 11

देशभरातील डॉक्टर आज संपावर..

मुंबई - इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला जोरदार विरोध केला आहे. याबाबतचा निर्णय त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी संघटना आक्रमक झाली आहे. या मागणीसाठी आज (शुक्रवार) देशभरातील लाखो आयएमए डॉक्टर संपावर जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील दीड लाखांहून अधिक डॉक्टरांचा समावेश असणार असून, राज्यातील दवाखाने, क्लिनिक, हॉस्पिटलमधील ओपीडी बंद राहणार आहेत. सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत डॉक्टरांचा संप असणार आहे. त्यामुळे या काळात राज्यासह देशभरातील आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा उडण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण..

केंद्रीय मंत्रालयाच्या कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने 24 नोव्हेंबरला एक परिपत्रक काढत आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार आता एमएस केलेल्या आयुष डॉक्टरांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करता येणार आहेत. या निर्णयाला आयएमए डॉक्टरांनी मात्र जोरदार विरोध केला आहे. अत्याधुनिक वैद्यकीय शास्त्रातील शस्त्रक्रिया करण्यास आयुष डॉक्टरांना परवानगी देणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळ असल्याचे म्हणत आयएमएने याला विरोध केला आहे.

या गोष्टी राहणार सुरू..

दवाखाने, क्लिनिक आणि ओपीडी सेवा जरी बंद राहणार असल्या तरी आयसीयू, अपघात विभाग आणि कोरोना कक्षातील रुग्णसेवा मात्र सुरळीत असणार आहे, अशी माहिती डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र यांनी दिली आहे.

...अन्यथा कोर्टात जाणार

आजच्या संपात आयएमएच्या महाराष्ट्रातील 218 शाखामधील 45 हजार डॉक्टरांसह, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील 1 लाख 10 हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत. तर एमएमबीएस विद्यार्थी, निवासी डॉक्टरांचाही या संपाला पाठिंबा आहे. दरम्यान, आजच्या आंदोलनानंतर केंद्राने लक्ष दिले नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा दिला आहे. तसेच गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असेही आयएमएने स्पष्ट केले आहे.

Last Updated : Dec 11, 2020, 1:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.