ETV Bharat / city

आयआयटी मुलींच्या वॉशरुममध्ये डोकावण्याचा प्रयत्न, कँटीनमधील तरुणाला अटक - आयआयटी मुंबई

आयआयटी मुंबईने या घटनेचा निषेध केला आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत असल्याचं सांगितलं आहे.चंदिगढमधल्या मुलींच्या हॉस्टेलमधले काही व्हिडीओ व्हायरल झाल्याची घटना ताजी असतानाच हा गंभीर प्रकार मुंबईत घडल्याचं समोर आला आहे.

आयआयटी मुंबई
आयआयटी मुंबई
author img

By

Published : Sep 20, 2022, 4:43 PM IST

Updated : Sep 20, 2022, 8:39 PM IST

मुंबई - चंदीगडमधील घटना ताजी असतानाच मुंबईमध्येदेखील एका हॉस्टेलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, वेळीच आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयआयटी हॉस्टेलमधील मुलींच्या वॉशरूममध्ये डोकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव पिंटू असून तो कँटीनमध्ये काम करत होता. आरोपीकडून कुठलेही फुटेज आढळून आलेले नाही. मात्र, पोलिसांकडून चौकशी सुरु ( IIT Bombay hostel canteen ) आहे.

आयआयटी मुंबईने या घटनेचा निषेध केला आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत असल्याचं सांगितलं आहे.चंदिगढमधल्या मुलींच्या हॉस्टेलमधले काही व्हिडीओ व्हायरल झाल्याची घटना ताजी असतानाच हा गंभीर प्रकार मुंबईत घडल्याचं समोर आला आहे. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांनी सांगितले की, आमच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही आरोपीला रविवारी रात्री चौकशीसाठी बोलावले आणि नंतर चौकशी दरम्यान अटक केली. आरोपी विरोधात आयपीसी कलम 354 सी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलू- आयआयटी मुंबईच्या विद्यार्थीनीने पवई पोलिसांत एक तक्रार दाखल केली आहे. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याने रविवारी रात्री लेडीज हॉस्टेलच्या 10 (H10) बाथरुमच्या खिडकीतून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून या २२ वर्षांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अद्याप तसा कोणताही व्हिडीओ सापडलेला नाही. बुधवारी या आरोपीला न्यायालयात हजर केले जाईल. आरोपीने विद्यार्थीनीच्या बाथरुममध्ये डोकावण्यासाठी ज्या पाईपचा वापर केला होता तो पाईप बंद करण्यात आल्याचे आयआयटी प्रशासनाने म्हटले आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलू, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गरजेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईटची सोय- आयआयटी मुंबईचे डीन प्रो. तपनेंदु कुंडू यांनी सांगितले की, हॉस्टेलचे कॅन्टीन पुरुष कर्मचारीच चालवित होते. बाहेरच्या भागातून बाथरुमपर्यंत पोहोचण्याची वाट सील करण्यात आली आहे. यानंतर विंग एच १० ची पाहणी करून गरजेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईटची सोय करण्यात आली आहे.

कॅन्टीन तात्काळ बंद करण्यात आले- हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आयआयटी मुंबईने एक निवेदन जारी केले आहे. आयआयटीच्या वसतिगृहातील नाईट कॅन्टीनचा कर्मचारी पाईप डक्टवर चढून बाथरूममध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कॅन्टीन तात्काळ बंद करण्यात आले आहे. महिला कर्मचारी असतील तरच ते सुरू करण्यात येणार आहे

Last Updated : Sep 20, 2022, 8:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.