मुंबई - "आमचे तीन आणि महाविकासआघाडीचे तीन उमेदवार राज्यसभा वर पाठवण्याचे दोन्हीकडून ठरलं तर घोडेबाजार होणारच नाही" असं सूचक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाकडून जाहीर झालेल्या राज्यसभेचे तिन्ही उमेदवारांचा उमेदवारी अर्ज आज विधान भवनात भरण्यात आला. भाजपकडून राज्यसभेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, हर्षवर्धन पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार मनोज कोटक यांच्यासह भाजपचे नेतेमंडळी उपस्थित होती.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या घोडेबाजार होण्याबाबतचा आरोप खोडून काढला. राज्यसभेवर भाजपकडून तीन आणि महाविकास आघाडी सरकारकडून तीन उमेदवार गेल्यास घोडेबाजार होणार नाही. आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सद्सद्विवेक बुद्धीने आम्हाला मतदान होईल - राज्यसभेसाठी 42 मतांचा कोटा एका उमेदवारासाठी लागतो. त्यासाठी 2 उमेदवारासाठीचा कोठा भाजपकडे आहे. मात्र तिसऱ्या उमेदवारासाठी दहा ते अकरा मतांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे. मात्र आमदार सद्सद्विवेक बुद्धीने आपल्याला मतदान करतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. आमचा तिसरा उमेदवारही निवडून येईल असा विश्वास असल्यामुळे आपण तिसरा उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच घोडेबाजार होऊन उमेदवार हरण्याची भीती शिवसेनेला जर असेल तर, त्यांनी आपला उमेदवार मागे घ्यावा असा टोलाही देवेंद्र फडणीस यांनी लगावला.
शिवसेनेने केलेला विश्वासघाताचा वचपा काढणार - गेल्या वेळी राज्यात देवेंद्र फडणीस यांचे सरकार होते. त्यावेळी राज्यात भाजप सरकार चांगलं काम करत होतं मात्र शिवसेनेने विश्वासघात केल्यामुळेच राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आले. मात्र आता राज्यसभेच्या निवडणुकीतील भाजप शिवसेनेचा याबाबतचा वचपा काढेल असा इशारा पियुष गोयल यांनी शिवसेनेला दिला आहे. देशात आठ वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. हे सरकार गरीब आणि शोषित वर्गासाठी कटिबद्ध असून, आठ वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामांमुळे शोषित आणि गरिबांची मन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिंकली.
तसेच यावेळी राज्यसभेसाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आपल्याला संधी दिल्या बाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्यांचे आभार मानले.
आमचे तीन आणि त्यांचे तीन उमेदवार ठरले तर घोडेबाजार होणारच नाही - देवेंद्र फडणवीस - घोडेबाजार होणारच नाही देवेंद्र फडणवीस
भारतीय जनता पक्षाकडून जाहीर झालेल्या राज्यसभेचे तिन्ही उमेदवारांचा उमेदवारी अर्ज आज विधान भवनात भरण्यात आला. भाजपकडून राज्यसभेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला.