मुंबई - नानार ऊर्जानिर्मिती प्रकल्पाबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. त्यामुळे शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले (Pravin Darekar On Nanar Project ) आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे तीन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर ( Aaditya Thackeray Konkan Tour ) आहेत. आज आदित्य ठाकरे रत्नागिरीत असून, नानार येथे होणारा ऊर्जा प्रकल्प कोकणातच नागरिकांच्या परवानगीने केला जाईल, असे सूचक वक्तव्य केले ( Aaditya Thackeray On Nanar Project ) आहे. त्यामुळे नानार प्रकल्पबाबत आधी विरोध आणि आता घेतलेल्या भूमिकेवर प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आता नाना ऊर्जा प्रकल्पाबाबत शिवसेनेचे मतपरिवर्तन झालं असेल तर, त्यांनी ते ठामपणे सांगावे असे आव्हान प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला दिले ( Pravin Darekar Challenge To Aaditya Thackeray ) आहे. आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दरेकर यांनी शिवसेनेला हा टोला लगावला.
निधी वाटपाबाबत शिवसेनेत खदखद : शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी शिवसेना आमदारांच्या भावना व्यक्त केल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी वाटपाबाबत शिवसेनेच्या आमदारांसोबत दुजाभाव केला जातो. याआधी खासदार श्रीरंग बारणे, खासदार गजानन कीर्तिकर यांनी निधी वाटपाबाबत असंतोष व्यक्त केला होता. तसेच महाविकासआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेनेच्या वरचढ होतोय असा टोमणा देखील दरेकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.
नानांची वक्तव्य नौटंकीसाठी : काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर केलेल्या टीकेनंतर भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळतेय. नाना पटोले यांचे वक्तव्य हे नौटंकीसाठी असतात. पंतप्रधानांवर टीकाकरण्याएवढी पातळी नाना पटोले यांची नाही. त्यामुळे नानांच्या वक्तव्याला भाजप काडीचीही किंमत देत नसल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला यांची सह नेहमी राहील : आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या भविष्यातल्या मैत्री बाबत "आपल्यावर अन्याय होत असेल, तर मैत्रीचा विषय येतोच कुठे?" असे वक्तव्य केल्यानंतर त्यावर प्रवीण दरेकर यांच्याकडून समाचार घेण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या पाठीत शिवसेनेने खंजीर खुपसला. याची सल नेहमीच भाजपाला राहील. तसेच शिवसेना भाजपसोबत मैत्री किंवा युती करायला तयार आहे का? यापेक्षा भाजप शिवसेनेबरोबर युती किंवा मैत्री करेल का? असा प्रश्न प्रवीण दरेकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.